लोक न्यूज-
अमळनेर-येथील प्रताप महाविद्यालयाच्या कॅम्पस मध्ये आमदार चषक च्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा.शरद पवार तसेच अमळनेर विधानसभेचे आमदार अनिल पाटील यांचे अनधिकृत होर्डिंग लागल्याने भारतीय जनता युवा मोर्चाने अतिशय आक्रमक होत सदरचे होल्डिंग्स महाविद्यालय प्रशासनास काढण्यास भाग पाडले.
महाविद्यालय हे ज्ञान देणारे विद्यापीठ आहे, अशा ठिकाणी राजकीय नेत्यांचे होर्डिंग लावणे म्हणजे येणारी भावी पिढी खराब करण्याचे काम स्थानिक लोकप्रतिनिधी करत आहेत असा आरोप युवा मोर्चा ने करत या प्रकाराचा प्रखर विरोध केला,या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी प्रताप महाविद्यालयात धाव घेऊन कार्यालयासमोर आंदोलन केले,यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना लेखी निवेदन देण्यात आले.
यात म्हटले आहे की महाविद्यालयाचे नाव देशभर असून हे ज्ञान मंदिर असल्याने येथे ज्ञानाचे धडे दिले जातात,यातून विद्यार्थी घडतात यांमुळे आपल्या कॉलेजचे व तालुक्याचे नाव देशभर पोहोचले आहे,आजपर्यंत आपल्या महाविद्यालयाच्या परिसरात कुणीही राजकीय पक्षाचा प्रचार प्रसार केलेला नाही व महाविद्यालयिन प्रशासनाने देखील असा प्रकार होऊ दिलेला नाही,मात्र गेल्या दोन दिवसात महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर एका पक्षाच्या नेत्यांचे व लोकप्रतिनिधींचे फोटो असलेले होल्डींगस लावलेले आहे,यामुळे विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ शकतो राजकीय हेतूनेच हा प्रकार केला असावा यामुळे
अनाधिकृत पणे लागलेले हे होर्डिंग तात्काळ काढायला हवे अशी मागणी केल्याने कॉलेज प्रशासनाने लावलेले होल्डींगस काढण्याची कारवाई केली .
सदर आंदोलनातयुवा मोर्चा तालुका अध्यक्ष शिवाजी राजपूत, सरचिटणीस राहूल चौधरी, उपाध्यक्ष कल्पेश पाटील, सचिव भूषण पाटील,सागर धनगर,निनाद जोशी,हर्षल ठाकूर,ललित पाटील,अमोल पाटील,साहिल वारुळे,कमलेश कुलकर्णी व युवा मोर्चा पदाधिकारी आदी कार्यकर्ते सहभागी होते.



