लोक न्यूज-
राष्ट्रीय ओबीसी महासंघाची उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक संपन्न झाली असुन
येथील पत्रकार भवनात झालेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक आज दि.१२/३/२०२२ रोजी संपन्न झाली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डी.डी.पाटील यांनी केले. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे,मा.प्रा.शरदराव वानखेडे,मा.सुभाष घाटे,मा.भटूभाऊ नेरकर, श्रीधर चौधरी, अण्णाभाऊ पाटील  मंचावरील उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.