लोक न्यूज-
अमळनेर:- आ. श्री शिरिषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीच्या मा. नगरसेविका सौ कल्पना पंडीत चौधरी यांची प्रधान सचिवांकडे व नगरविकास मंत्री कडे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी जिल्हाधिकारीचा आदेशाची पायमल्ली केल्याबाबत तक्रार केली आहे. 
 सौ.चौधरी यांनी 10/12/2018 रोजी नगराध्यक्षांना नमुना क्र 64 वर सही करायचे अधिकार नसल्याबाबत शासनाचे आदेश व धोरण असल्याचे निदर्शनास आणून देत तक्रार केली होती.त्यास अनुसरून तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी तक्राराची दखल घेत तात्काळ जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांना नगराध्यक्षांना सही करण्याची गरज नसल्याचे आदेशीत केले होते. त्यास अनुसरून आर्थिक व्यवहारात सही करण्यास ,मिळत नसल्याने काही नगराध्यक्ष कोर्टात गेले होते.नगरपरिषदेचे सर्व धनादेश हे देयक क्र.64 वर सही करूनच दिले जात असल्याने नगराध्यक्षाचे विशेष नुकसान होत होते. त्यामुळे ते न्यायालयात गेले होते.परंतु तरी देखील कुठलेही स्थगिती त्यांना मिळाली नसल्याचे मा.जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दि.11/05/2021 च्या पत्रात म्हटले आहे. तरी देखील मुख्याधिकारी श्री सरोदे यांनी जिल्हाधिकारी यांचा आदेशाची पायमल्ली करत  नमुना क्र 64 वर नागराध्यक्षांची सही घेतल्याचे निदर्शनास आले आहे. तरी घडलेला प्रकार गंभीर आहे. प्रशासनातीलच जबाबदार अधिकारी जर जिल्हाधिकारी साहेबांचा आदेशाला जुमानत नसतील तर हे अतिशय निदनिय व गंभीर असल्याचे सौ कल्पना चौधरी यांनी मत व्यक्त करत मा नगरविकास मंत्री ,प्रधान सचिव नगरविकास विभाग,जिल्हाधिकारी जळगांव यांना तक्रार केली आहे.