लोक न्यूज-
या महामारीमध्ये संपूर्ण जगाचे कामकाज ठप्प झाले होते. आपल्या मर्चंट नेव्ही सीफेरर्स आणि क्रूझ मरिनर्स या आघाडीच्या कामगारांद्वारे जलमार्गाद्वारे पुरवठ्याचा एकमेव स्त्रोत होता.  ते लॉकडाऊनच्या संपूर्ण काळात काम करत होते आणि जगभरात आवश्यक वस्तू आणि औषधांचा पुरवठा करत होते. अशा आपत्कालीन परिस्थितीत आघाडीच्या कार्यकर्त्यांची भूमिका किती महत्त्वाची असते हे त्यांनी जगाला  दाखवून दिले आहे. ॲाल इंडिया सिफेरर्स यूनियन चे अध्यक्ष संजय पवार यांनी भारतीय तसेच सर्व राज्य आरोग्य विभागाचे खूप खूप आभार मानले की, जे कोवीड मध्ये तुम्ही सिफेरर्सला प्राधान्याने लस मिळण्यासाठी जी तातडीने निर्णय घेतले. त्यामुळे या कार्याला चांगली गती आली आहे. यूनियन चे कार्याध्यक्ष अभिजीत सांगळे यांनी लसीकरणाच्या बूस्टर डोस या मधील अंतर हा विषय समोर आणला आहे. बहुतांश सीफेरर्स हे क्रूज शिपवर नोकर्‍या करत आहे.  आणि संध्या न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, यूके, युरोपचे भाग, युएई, सिंगापूर यासारख्या बर्‍याच देशांनी “बूस्टर डोस कंपलसरी” हे धोरण अवलंबले आहे. 
    आपल्या भारत तसेच महाराष्ट्रा मध्ये क्रुज आणि मर्चंट शिपिंग असे दोन्ही सिफेरर्स आहेत, बहुतांश आत्ता २ रा डोस पूर्ण करून परत मायदेशी आली आहेत, बऱ्याच सिफेरर्सने दूसरी लस घेतली आहे. आय.सी.एम्.आर. च्या जुन्या निर्देशा नुसार २८ दिवसांनी दूसरा डोस घेता येईल असे नमूद आहे परंतु नवीन निर्देशा नुसार हा बूस्टर डोस चा कालावधी वाढवून ९ महीने केला आहे. ज्यांनी २ री लस घेतली आहे आणि  त्यांची जॉयनिंग तारीख जवळ आली आहे, परंतू बूस्टर डोस न घेता आल्यामुळे त्यांना नोकरी वर रुजू होता आल नाही. आता याच अनुषंगाने लसीचा बूस्टर डोस यातील अंतर कमी करून ५ ते ६ महीने करण्यात यावा व  वसई विरार तसेच पूर्ण भारता मधील  सिफेरर्सला याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा अशी मागणी ॲाल इंडिया सिफेरर्स आणि जनरल वर्कर्स युनियन ने महाराष्ट्र राज्य आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच केंद्रीय मंत्री मन्सूक मांडविया यांना पत्रा द्वारे केली आहे.