लोक न्यूज-
अमळनेर : तालुक्यातील मांडळ येथे जितेंद्र संजय माळी याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. वाढत्या तापमानाचा मांडळ येथील तरुण पहिला बळी ठरला आहे. 
      जितेंद्र संजय माळी वय  ३३ हा २८ रोजी  सकाळी खेड्यांवर व मांडळ गावात खमण विक्री करून  आल्यानंतर दुपारी बारा वाजेपासून तो स्वतःच्या शेतात मका काढण्यासाठी गेला. भर उन्हात दिवसभर काम केल्याने संध्याकाळी त्याला शेतातच चक्कर आले. त्याचा चुलत भाऊ महेंद्र काशिनाथ माळी यांच्यासह शेतातील काम करनाऱ्यानी त्याला डॉ सुनील चोरडिया यांच्याकडे दाखल केले. त्यांनी प्रथमोपचार करून जितेंद्र ला ऊन लागले आहे म्हणून अमलनेरला घेऊन जा असे सांगितले. जितेंद्र ला अमळनेर नेत असताना तो रस्त्यात बेशुद्ध पडला. ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डॉ आशिष पाटील यांनी त्याचे शवविच्छेदन केले. त्याला उष्माघात सदृश्य लक्षणे होती व मेंदूत रक्तस्राव झालेला होता असे डॉक्टर आशिष पाटील यांनी सांगितले.
महेंद्र माळी यांनी मारवड पोलीस स्टेशनला शेतात काम करताना ऊन लागल्याने जितेंद्र चा मृत्यू झाल्याची खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील करीत आहेत.