लोक न्यूज-
आज ग्रामपंचायत सुंदरपट्टी यांचेकडून राबविण्यात आलेल्या सुरक्षित ग्रामपंचायत या योजने अंतर्गत सुंदरपट्टी येथे बसविण्यात आलेल्या सी.सी.टीव्ही कँमेरा याची पाहणी करण्यासाठी अमळनेर विभागाचे डी .वाय .एस.पी. यांनी सुंदरपट्टी गावाला भेट देऊन गावातील सी.सी.टिव्ही कँमेराची पाहणी कली तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने आणखी कोणत्या ठिकाणी कँमेरा बसवावे याविषयी पाहणी करून नंतर जि.प.उच्च प्राथमिक शाळा सुंदरपट्टी येथे घेण्यात आलेल्या स्वागतसोहळ्यात याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येक गावात अशा प्रकारच्या सुरक्षा व्यवस्थेची गरज का आहे हे समजावून सांगितले . तसेच ही व्यवस्था मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यासाठी लोकसहभागाची गरज आहे हे समजावून सांगितले व स्वतः सुंदरपट्टी गावासाठी रुपये पाच हजार देणगी देवून सर्व गावकरी याच्या समोर एक आदर्श निर्माण केला. या कार्यक्रमात गावात नवीन निर्माण करण्यात आलेल्या ग्राम सुरक्षा रक्षक दलाच्या तरूणांना ही मार्गदर्शन केले तसेच गावपाहणी करत असताना गावातील स्वच्छता, व्यायाम शाळा सोलर पँनल,  अक्वा पाँइंट ,या सर्व गोष्टी या छोट्याशा गावात आहेत याबद्दल तसेच गावात बऱ्याच वर्षांपासून असलेली दारुबंदी यासाठी डि. वाय .एस. पी . यांनी लोकनियुक्त सरपंच श्री. सुरेश अर्जुन पाटील याचे कौतुक केले व गावात मोठ्या प्रमाणावर व्रुक्षारोपण करावे असे आवाहन केले. या प्रसंगी सरपंच श्री.सुरेश पाटील यांनी लवकरच संपूर्ण गाव सीसीटीव्ही च्या नजरेत आणू असे आश्वासन दिले .याप्रसंगी जेष्ठ नागरिक श्री.निळकंठ पाटील, श्री. उत्तम पाटील यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले या कार्यक्रमासाठी हे.काँ.संजय बोरसे  प्रदीप चव्हाण ,श्री सूरेश ढिवरे पोलिस पाटील यांनी सहकार्य केले  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री.संजय जगताप यांनी केले सौ.जयश्री बारड मँडम श्रीम.स्मिता सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले.