लोक न्यूज-
निवेदनात म्हटले आहे की,
18 मार्च 2022 रोजी होळी आणि धुलीवंदन या सणा निमित्ताने आमचे भोई समाज बांधव सण साजरा करत असतांना डी जे आवाजाचे निमित्त करून काही धर्माधांनी सण साजरा करणाऱ्या समाज बांधवांन वर अचानक हल्ला केला दगड विटा आणि धारदार तीक्ष्ण हत्यारने हल्ला करून समाज बांधवांना जखमी केले त्यात भोई समाजाचे तीन बांधव जखमी झाले त्या पैकी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत एकाला ओम क्रिटीकेअर धुळे येथे ॲडमिट केले असुन दुसऱ्याच्या हतावर व अंगावर तिक्ष्ण हात्यारांनी वार केल्यामुळे हाताच्या नसा कापल्या गेल्या आणि गंभीर दुखापत झाल्याने धुळे येथे ॲडमिट केले आहे.
हात व जिव वाचविण्यासाठी तात्काळ मुंबई येथे नेण्याची सुचना डॉक्टरांनी केली त्यानुसार मुंबई येथे ऑपरेशन साठी पाठविले आहे इतरांचा धार्मिक सण साजरा करत असतांना आम्ही कधी आडकाठी करत नाही.
संवीधानाने सगळ्यांना आप आपले सण साजरा करायचे अधिकार दिले असतांनाही आमचे सण साजरे करताना तरीही आम्ही सुरक्षित राहीलो नाही भ्याड हल्ला करणाऱ्यान विरोधात कठोरात कठोर कारवाई करून त्यांचा वरती गुन्हा नोंदविण्यात यावा. अशी मागणी पारोळा पोलिस स्टेशन येथे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी उपस्थित भोई समाजा युवा मंच उत्तर महाराष्ट्र महा संघटक प्रमुख जयेश भोई . सागर भोई. गौरव भोई.प्रविण भोई. सागर भोई. सचिन भोई.ज्ञानेश्वर भोई.पंकज भोई. रितेश भोई.विशाल भोई प्रतिक बडगुजर व भोई समाज युवा मंच महाराष्ट्र