लोक न्यूज-
प्रत्यक्ष नदीपात्रात काँक्रीट कामाचा आमदार अनिल पाटलांच्या हस्ते शुभारंभ,155 मीटर पर्यंत होणार प्रस्तंभ बांधकाम
अमळनेर तालुक्यातील निम्न तापी पाडळसरे प्रकल्प म्हणजे अमळनेर तालुक्यासह व परिसरातील शेतकरी आणि जनतेसाठी नवसंजीवनीच दरम्यानच्या काळात खंड पडलेल्या धरणाच्या कामात गती येत असल्याने या कामास सर्व धरण प्रेमींच्या सदिच्छा मिळाव्यात म्हणून आ.अनिल पाटील यांनी दि 6 मार्च रोजी धरण पाहणीचा सामूहिक दौरा आयोजित केला होता. यानिमित्ताने त्यांनी तमाम पाडळसरे धरण प्रेमी आणि राजकीय , सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शेतकरी बांधवाना "चला जाऊया पाडळसरे धरणावर" असे भावनिक आवाहन केले होते,रविवारी सकाळी 9.30 वाजता हा धरण पाहणी दौरा झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष-माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराथी, प्रमुख उपस्थिती माजी आ.डॉ बी एस पाटील,चोपडा चे माजी आमदार कैलास पाटील,माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, जि प सदस्या सौ जयश्री पाटील,अधीक्षक अभियंता वाय के भदाणे,सौ सुनीता बी पाटील,प्रा रंजना देशमुख, योजना पाटील,कविता पवार,आशा चावरिया, माधुरी पाटील व पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे सर्व कार्यकर्ते तसेच राजकीय सामाजिक पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे पाठ मागे सपाट..........
मात्र धरणालगत काही गावांच्या शेतकऱ्यांनी अनपस्थिती दिली.मारवड मंडळ मधील सन 2019 मधे अतिवृष्टि झाल्याने शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तिरक्कम अजूनही 32 गावातील शेतकऱ्यांना मिळाली नाही त्यामुळे आज धरण स्थळी जाने शेतकऱ्यांनी टाळले व आमदार पाटील यांच्यावर नाराजी ओढवली आहे. अतिवृष्टी झालेल्या गावांचा आमदारांनी त्यांच्या कोणत्याही समस्या सोडवल्या नाहीत म्हणून या गावानी आमदारांन वरती नाराजी व्यक्त केलेली दिसून येत आहे.अशा शेतकऱ्यानं कडून प्रतिक्रिया व्यक्त होतांना दिसून आल्या.