लोक न्यूज-
अमळनेर-येथील शाहआलम नगरात भव्य शादीखाना बांधकामासाठी आ.अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने 40 लाखांचा भरीव निधी मंजूर झाल्याने याचा भूमिपूजन सोहळा आज दि 17 फेब्रुवारी रोजी शहाआलम नगरात सायंकाळी 5 वाजता पार पडणार आहे.
यावेळी आमदारांसह माजी आ कृषिभूषण साहेबराव पाटील,नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील,जि प सदस्या सौ जयश्री अनिल पाटील,बाजार समितीच्या मुख्य प्रशासक सौ तिमोत्तमा पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक यासह असंख्य मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.तरी मुस्लिम समाजास ही मोठी भेट आमदारांकडून मिळाल्याने यावेळी सर्व समाज बांधवांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन हसनेंन करिमेन वेलफेअर संस्थेचे अध्यक्ष के आर शेख,राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष शेख रफिक हाजी फिरोजोद्दीन आणि कार्याध्यक्ष मुशीर शेख यांनी केले आहे.