लोक न्यूज-
काल दि.23-10-2021 रोजी नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात तोडफोड युवकास वेळीच उपचार न मिळाल्याने आक्रोश येथील प्राथमिक प्राथमिक आरोग्य केंद्रात नरडाणा येथील युवकास वेळेत उपचार न मिळाल्याने व डॉक्टर नसल्याने युवकाच्या नातेवाईकांनी संपूर्ण दवाखान्यात प्रचंड तोडफोड केली त्यामुळे सरकारी दवाखान्याला संध्याकाळी उशिरापर्यंत पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की दि.23-10-2021  दुपारी दीपक रवींद्र वडर 20 हा नरडाणा पोलीस स्टेशनच्या मागील भागात वराह पकडत होता शेताजवळील भागात अर्धवट बुजलेल्या अवस्थेत  असलेल्या एका विहिरीत दीपक पडला यावेळी दिपकला त्याच्या मित्रांनी बाहेर काढून नरडाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते यामुळे दीपकच्या नातेवाईकांनी तीव्र संतप्त भावना व्यक्त करत प्राथमिक आरोग्य केंद्राची तोडफोड सुरु केली यात प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व  खुर्च्या औषधे फर्निचर काच ैद्यकीय अधिकार्‍यांचे केबिन औषधालय व आरोग्य केंद्रातील विविध अत्यावश्यक सेवा सुविधांना तोडण्यात आले यांची तोडफोड करण्यात आली यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नरडाणा येथील सपोनि मनोज ठाकरे पीएसआय शरद पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्वरूप बदलले होते रात्री उशिरापर्यंत नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्राला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते मृतांच्या नातेवाईकांनी प्रेत घ्यायला नकार दिल्याने घटना गंभीर झाली होती मृताच्या नातेवाइकांनी मृत असलेल्या युवकाच्या कुटुंबास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आर्थिक मदत करावी वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करावे व मृत झालेल्या व्यक्तीच्या वडील भावास शासकीय नोकरी द्यावी अशा मागण्या प्रशासनापुढे ठेवल्याने चला ही घटना अधिक तीव्र आली होती रात्री उशिरापर्यंत हा घोळ सुरू होता नरडाणा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ विशाल पाटील प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ निलेश पाटील सहाय्यक तालुका आरोग्य अधिकारी वाडेकर यांच्यात रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती यावेळी धुळे विभागीय पोलिस अधीक्षक प्रदीप मैदाने शिंदखेडा चे पोलीस निरीक्षक सुनिल भाबड शिरपूर चे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख आदींसह राइट कंट्रोल प्लाटून या शिंदखेडा व धुळे येथून मागविण्यात आल्या होत्या रात्री उशिरापर्यंत त्याचे नातेवाईक शासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांच्यामध्ये या वादावर बैठक सुरू होती.


सपोनि मनोज ठाकरे,नरडाणा
नरडाणा पोलीस स्टेशन येथे  ए.डी. दाखल असून पुढील तपास सुरू आहे.आरोग्य विभाग काय भूमिका घेते त्या पद्धतीने पुढील प्रोसेस सुरू राहील.