लोक न्यूज-
अमळनेर-जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत अमळनेर तालुका विविध कार्यकारी सोसायटी गटातून प्रतिस्पर्धी उमेदवाराचे अपील विभागीय सहनिबंधकांनी देखील फेटाळल्याने संचालकपदी आ.अनिल पाटील बिनविरोध झाले आहेत,यापार्श्वभूमीवर कालपासून संपूर्ण जिल्हाभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून काल त्यांच्या निवासस्थानी सत्कार करणाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती.
यानिमित्ताने आमदार अनिल पाटील यांनी बँकेत संचालक पदाची हट्रिक पूर्ण केल्याने सहकार क्षेत्रात खरोखरच त्यांनी आपला दबदबा सिद्ध केला आहे,याचा परिणाम आगामी बाजार समितीच्या निवडणुकीवरही होण्याचे संकेत मिळत आहेत.याआधीच एक प्रबळ उमेदवार म्हणून आ अनिल पाटील यांच्याकडे पाहिले जात असताना सोसायटी गटातील प्रतिस्पर्धी उमेदवार माजी आ स्मिता वाघ सह अन्य दोन उमेदवारांचे अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाल्याने या गटात आता आमदार अनिल पाटील यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहून त्याच वेळी त्यांचा बिनविरोध चा मार्ग मोकळा झाला होता,मात्र त्यानंतर अर्ज फेटाळले गेलेल्या भाजपच्या 9 उमेदवारांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले होते,त्यात स्मिता वाघ यांचाही समावेश होता मात्र सदरचे अपील विभागीय सहनिबंधकांनी फेटाळून लावल्याने आ अनिल पाटील बिनविरोध विजयी झालेत त्यामुळे राष्ट्रवादी व महाविकास कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.
आ.अनिल पाटील यांची बिनविरोध निवड तथा हेट्रिक झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीची राज्य भरातील नेते मंडळी तसेच जिल्ह्यातील आमदार व सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले तर अमळनेर मतदारसंघातुन जवळपास प्रत्येक गावातील हितचिंतक व कार्यकर्ते त्यांच्या सत्कारासाठी आमदार निवासात भेट देत आहेत.