लोक न्यूज-
अमळनेर: महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा, उदय सामंत व आरोग्य विभाग, महारष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात महाविद्यालयीन तरुण विद्यार्थ्यांसाठी मिशन युवा स्वास्थ लसीकरण मोहिमेस सुरवात झाली असून प्रत्येक जिल्हा, तालुका तसेच ग्रामीण भागातील महाविद्यालयात स्थानिक आरोग्य विभागाच्या मदतीने कोविड-१९ लसीचे डोस देण्यात येत आहेत.
    या मोहिमेचाच एक भाग म्हणून येथील खा. शि. मंडळ संचालित स्व. श्री. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी. फार्मसी महाविद्यालयात प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे दिनांक २९ ऑक्टोबर रोजी लसीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी फार्मसी महाविद्यालयाचे चेअरमन सी. ए. नीरज अग्रवाल, नगर पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन, प्राचार्य रविंद्र माळी, समन्वयक प्रा.कुंदनकुमार पाटील, प्रा. दीपक बारी, प्रा. ललिता चौधरी, प्रा. शुभांगी विंचूरकर, प्रा. गायत्री पाटील, प्रा. देवेश भावसार व सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.  
महाविद्यालयाच्या या यशस्वी उपक्रमाबद्दल खा. शि. मंडळाचे कार्याध्यक्ष जितेंद्र जैन, उपाध्यक्ष कल्याण पाटील, खा. शि मंडळ सदस्य हरी भिका वाणी, डॉ. संदेश गुजराथी, डॉ. बी. एस. पाटील, प्रदीप अग्रवाल, योगेश मुंदडे, चिटणीस डॉ. ए. बी जैन यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.