शिरपूर-लोक न्यूज-
तालुक्यात सामाजिक उपक्रमासाठी प्रसिद्ध असलेल्या कनगई गावात राष्ट्रीय कबड्डीपटू तथा आदिवासी रत्न पुरस्काराने सम्मानित चुनिलाल पावराच्या नेतृत्त्वात जागतिक आदिवासी दिनानिनित्त सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम ऊत्साहात संपन्न झाला. सकाळी झालेल्या ढोल मांदलच्या रैलीत आदिवासी संस्कृति अवतरली. कार्यक्रमा दरम्यान विविध उपक्रमाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले.
बिरसा मुंडा मोफत शिकवणी वर्ग व युवकांच्या सहकार्याने सालाबादाप्रमाणे यंदाही 'जागतिक आदिवासी दिनाचा' अबाल वृद्धांमधे मोठा ऊत्साह दिसून आला. ढोल - मांदलच्या थापावर निघालेल्या रैलीत आदिवासी पेहराव, दागीने, पारंपरिक हत्यार हातात घेवुन अप्रतिम नृत्य करत सर्वांचे लक्ष वेधत होते. दरम्यान आदिवासी गीत बनवणाऱ्या 'आदिवूडच्या' टीमचे आगमन झाल्यावर ऊत्साह द्विगुणीत झाला. रैली संपल्यानंतर आदिवासी क्रांतिवीर, देवतांच्या प्रतिमापुजन झाल्यावर जवळपास 20 गाण्यांवर शालेय मुलांनी अप्रतिम नृत्य सादर केले. दरम्यान 10 वी 12 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बिरसा फायटर्स व आर्या प्रोडक्शनने प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी लहान मुली - मुले यांनी जोरदार भाषणेही केलीत. प्रेक्षकांच्या मागणीनुसार आदिवूडच्या टीमने हातोमा धंदली लीने, जानूडी, आदिवासी शेर आया, निंडावे टीकी या गाण्यांवर अप्रतिम नृत्य करत सर्वांची मने जिंकली. आदिवासी गायक भीम कनोजे यांनी गाणे म्हणत सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. यावेळी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष मनोज पावरा, नाशिक विभाग अध्यक्ष विलास पावरा, धुळे जिल्हा महासचिव साहेबराव पावरा, शिरपूर तालुकाध्यक्ष ईश्वर मोरे, सचिव रवी पावरा, आदिवूड फॅमिलीचे डायरेक्टर रोहित वैशाखी, नायिका प्रिया सोलंकी, सुनेना नरगावे, नायक मयुर चौहान, अरूण सेनानी, अर्जून सिंग, मुकेश पावरा, गायक भीम कनोजे, मनिष भोसले
गावातील ज्येष्ठ नागरिक रमेश काका पावरा शांतीलाल पावरा शिवलाल पावरा मगन पावरा रंदिष पावरा विशाल पावरा भुलाराम पावरा यांचे अनमोल सहकार्य लाभले त्या मुळे कार्यक्रम सुरळीत पार पाडला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.