लोक न्यूज-

मारवड मंडळात आज रोजी जिल्हा कृषी अधीक्षक श्री संभाजी ठाकुर व इतरत्र अधिकाऱ्यांनी दुष्काळ परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या कापूस मका ज्वारी बाजरी आदी पिकांची दुबार केलेली लागवड व पेरणी वाया गेल्याने प्रत्यक्ष पाहणी केली याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या तीन दिवसा पूर्वी मारवड अमळगाव भरवस या तीन मंडळातील शेतकऱ्यांनी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाले असल्याने माननीय जिल्हाधिकारी श्री अभिजित राऊत साहेब यांना निवेदन दिले होते की यावर्षी जून जुलै या दोन महिन्यात दुबार पेरणी व कापूस पिकाची लागवड केली होती मात्र पुरेसा पाऊस नसल्याने उतारा होऊच शकला नाही अशा अनेक ठिकाणी अत्यल्प पाऊस असल्याने गमभिर दुष्काळ परिस्थितीमुळे मुळे शेतकरी हैराण झाला असून आज रोजी आगस्ट महिना लागूनही पाऊस नाही त्यामुळे शेतकरी वर्गावर मोठे संकट निर्माण झाले असून एवढ्या संकटाला शेतकऱ्याला स्वतः संघर्ष करावा लागत आहे शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांना जावे लागले मात्र तरीही तालुक्याचे लोकप्रतिनिधी एवढी भीषण दुष्काळ परिस्थिती असूनही ठोस अशी दखल घेणे गरजेचे होते परंतु त्या उलट होतांना दिसत आहे तरीही एवढे भीषण दुष्काळ परिस्थिती असूनही शेतकरी पुत्र आजही सामना करीत आहेत गुरांसाठी चारा नाही चार ते पाच हजार रुपये प्रति टन ऊस खरेदी करून आणत असून तो चारा गुरांना खाऊ घालावा लागत आहे तरी या भीषण दुष्काळग्रस्त मारवड अमळगाव  भरवस या तिन्ही मंडळाची दिलेल्या निवेदनाची जिल्हाधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन आज रोजी मारवड मंडळात पाहणी साठी जळगाव जिल्हा कृषी अधीक्षक श्री ठाकूर साहेब तसेच जिल्हा पिकविमा कम्पनी समनव्यक श्री प्रभास साहेब  उपविभागीय अधिकारी कृषी श्री दादाराव जाधवराव तसेच अमळनेर तालुका कृषी अधिकारी भारत वारे मंडळ कृषी अधिकारी श्री प्रदीप निकम  कृषी सहायक योगेश वनजारी  दीपक चौधरी यांनी प्रत्यक्ष शेताची पाहणी केली त्यावेळी त्यांच्या सोबत  मारवड परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती त्यावेळी अधिकाऱ्यांना अमळनेर तालुका फ्रुटसेल चे  चेअरमन श्यामकांत पाटील,डॉ.विलास पाटील,तसेच किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील मारवड येथील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी सविस्तर माहिती दिली  यावेळी जिजाबराव पाटील मधुकर पाटील प्रकाश पाटील पंकज पाटील शरद पाटील अमोल पाटील चंपालाल शिंदे अनिल पाटील रुपेश पाटील दिनेश पाटील यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते