लोक न्यूज-
अमळनेर तालुका दुष्काळ जाहीर करावा  प्रहार जनशक्ती पक्षाच्या सदस्यांनी  निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली मागणी पावसाने अमळनेर तालुक्यावर अवकृपा केली आहे.आधीच गेल्या १७ महिन्यापासून सर्व सामान्य माणूस , शेतमजूर , कष्टकरी कामगार , विद्यार्थी , गोरगरीब जनता यांना कोरोनाने होरपळले आहे.त्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी , शेतमजूर हवालदिल झालेला आहे , शेतकरी राजाने दोन वेळेस तर काही ठिकाणी तिबार पेरणी झाली तरी शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.म्हणून अमळनेर तालुका दुष्काळी जाहीर करावा . त्वरित पंचनामे करीत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा , अमळनेर तालुका अवर्षण प्रणव क्षेत्रात आहे . पहिले कोरोना आणि आता दुष्काळ यामुळे शेतकरी आर्थिक विवेचनेत अडकला आहे.म्हणूनच शासनाने आमच्या शेतकऱ्यांचा विचार करून शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पंचनामे करून पिक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून द्यावा.तसेच भविष्यात पिण्याची पाण्याची भीषण समस्या होणार नाही.त्या दृष्टीने उपाय - योजना करून तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा . शासनाने ३० दिवसात तालुका दुष्काळ जाहीर करावा अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षास पुढील आंदोलनाची भूमिका जाहीर करावी लागेल याची गांभीर्याने नोंद द्यावी .
असे निवेदनाद्वारे म्हटले आहे
आमच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे : 
०१ ) अमळनेर तालुका दुष्काळी जाहीर कारावा . २ ) शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पंचनामे करा . ०३ ) पंचनामे करून शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ लवकरात लवकर द्या ०४ ) जनावरासाठी चारा छावणीचे नियोजन करा . ०५ ) भविष्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाय योजना करा . ०६ ) शालेय विद्यार्थीची फी ५० % माफ करावी आमच्या मागण्या शासना पर्यत पोहचवाव्यात असेही निवेदनात म्हटले आहे.यावेळी उपस्थित
सदस्य  अमळनेर तालुका श्री.गुलाब काशिनाथ पाटील श्री.रविंद्र भगवान पाटील श्री योगेश मोहन पवार श्री.रामचंद्र बबनराव पाटील श्री राजेंद्र व्यंकट पाटील श्री चिन्मय राजेंद्र पाटील  श्री प्रविण पुरुषोत्तम पाटील श्री.मनोज मन्साराम पाटील  श्री.समाधान सुधाम पाटील श्री हिरामण साहेबराव पाटील श्री.दिलीप निंबा पाटील  श्री.प्रशांत मच्छिंद्र पाटील  श्री.प्रमोद मधुकर पाटील श्री.महेश आत्माराम पाटील श्री.संतोष आत्माराम पाटील श्री , दिनेश जगतराव पाटील श्री.गोकुळ पुंडलिक कोळी श्री डी ए साळुंखे श्री संजीव पाटील श्री प्रमोद दिलीप पाटील.