रिपोर्ट-एस एम पाटील,अमळनेर
लोक न्यूज-
श्री साई गजानन सेवा मंडळ संचलित पायीवारी दि. २३/०८/२१ सकाळी ५.३० वा. मोठेबाबा मंदिरात महाआरती होऊन ओम नमो शिवाय।। गण गण गणात बोते मंत्राचा उच्चार करीत वारकरी मृदुंग टाळ विनाच्या गजरात निघाले माऊली गजानच्या पादुका पालखीत विराजमान करण्यात आल्या होत्या , रस्त्याने धार-मारवड-कळमसरे ,निम गावी वारकऱ्यांचे सडा रंगोळ्या कडून ढोल ताश्याच्या वाद्यात स्वागतहोत वारी निघाली . धार गावी जँगी स्वागत,शशिकांत पाटील यांनी सपत्नीक केले. विणेकरी विश्राम महाराज व श्री साई गजानन मंडळाचे कार्यकर्ते व अध्यक्ष यांचाही सन्मान करण्यात आला . मारवड येथे हायस्कूलला सुनीलजी मुंडदे व मुकेश साळुंखे यांनी उपवासाच्या चिवडा दिला रस्त्याने वाजत्री, प्रत्येक घरी पूजा अतिशय आनंद घेत
कळमसरे गावी वाद्याच्या जयघोषात वारीला हायस्कूल मध्ये साबुदाणा प्रसाद च एस डी सोनवणे आप्पा यांचे कडून देण्यात मंडळाचे अध्यक्ष शिवाजी मोहन पाटील यांचे हस्ते ,सरपंच ,उपसरपंच, टाक भाऊसो यांना गौरवण्यात आले तेथुन वारी माऊलीचा जयघोषात निम- कपिलेश्वर वेशीवर पोहचली त्या ठिकाणी कपिलेश्वर ट्रस्ट चे मगण भाऊसो व सी एस पाटील सर तसेच मंडळा चे अध्यक्ष एस एम पाटील ह भ प भगवान महाराज शहापुर , सनी महाराज, इसे सर व महिला बघिणी यांनी वारीसोबत येऊन ओम नमो शिवाय चा जयघोष करत वारी कपिलेश्वर मंदिरात पोहचली कपिलेश्वर महादेव भगवान चे दर्शन करून वारकऱ्यांनि महासत्संग केला भजन, गौळण वातावरण अगदी उत्साहित होते. कपिलेश्वर ट्रस्टच्या वतीने श्री साई गजानन मंडळाचे संचालक गुणवंत पवार, एस डी सोनवणे, विठ्ठल आप्पा पाटील, शिरीष डहाळे सुभाष साळुंखे, गुलाब पाटील ,नामदेव पाटील ,तुळशीराम पाटील ,वाल्मिक पाटील ,ईश्वर पाटील ,ए टी पाटील अशोक इसे,जे. बी.पाटील , रघुनाथ पाटील, विश्राम महाराज, राजेंद्रशिंग पाटील, गणेश बोढरे, राजेंद्र पाटील, डी ई पाटील ,आर व्ही पाटील, समाधान पाटील,व इतर वारकऱ्यांसह महिलांचा देखील श्री महामंडलेश्वर हंसानंदजी यांचे हस्ते श्रीफळ देऊन महाप्रसाद देण्यात आला. तसेच २०० वर्षी चे पुरातन काळापासून नावारूपाला आलेलेे त्रिवेणी संगमावरील श्री कपिलेश्वर क्षेत्र या ठिकाणी प्रथमच वारी आल्याने मंडळाचे अध्यक्ष शिवाजी मोहन पाटील यांचा सन्मान कपिलेश्वर ट्रस्टीच्या वतीने कपिलेश्वर मंदिराचा फोटो श्रीफळ महाप्रसाद देऊन करण्यात आला श्री नामदेव महारू पाटील यांनी व शिवाजी मोहन पाटील यांनी ११०००/- ची मदत कपिलेश्वर जीर्णोद्धार कार्यासाठी दिले.