अमळनेर(लोक न्यूज)
राज्यातील बोटावर मोजण्याइतक्याच शाळा पेपरलेस आहेत .त्यात खान्देश शिक्षण मंडळाच्या गंगाराम सखाराम हायस्कूलची नव्याने लौकिकमय भर पडली आहे.शिवाय ग्रीन स्कूल या संकल्पनेचा राज्यातील या एकमेव शाळेत ८३व्या वर्धापन दिनानिमित्त प्रारंभ झाला आहे. शाळेचा ग्रीन स्कूल व पेपरलेस उपक्रम राज्याच्या अन्य शाळांना आदर्श ठरेल .
दरम्यान पुढच्या पिढीला आदर्श अशी शाळा येत्या काळात उभी करा त्यासाठी मी माझ्या आमदार निधीतून मोठी मदत करेल.असे आश्वासन आमदार अनिल पाटील यांनी या उपक्रमाचे उद्घाटक म्हणून दिले. त्यांनी शाळेचे चेअरमन योगेश मुंदडे व मुख्याध्यापक डिगम्बर महाले यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष व खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष जितेंद्र जैन,कार्योपाध्याक्ष नीरज अग्रवाल,माजी आमदार साहेबराव पाटील,जि.प.सदस्या जयश्री पाटील,संस्थेचे संचालक प्रदीप अग्रवाल,संदेश गुजराथी,हरी भिका वाणी,अध्यक्ष अनिल कदम,उपाध्यक्ष कमल कोचर व माधुरी पाटील,विश्वस्त वसुंधरा लांडगे, अभिजीत भांडारकर,निलेश भांडारकर, प्रभाकर कोठावदे , प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश शिरोडे,अनिल वैद्य,द्रौ.रा. कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका जे.के.सोनवणे ,उपमुख्याध्यापक ए. एस. करस्कार, पर्यवेक्षक व्ही. व्ही. कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार पाटील यांनी ध्वजारोहण करून शाळेचा लोगो असलेला संदेशात्मक कंदील फुग्यांचा सहाय्याने आकाशात उंच सोडला. आमदारांनी सपत्नीक भूमातेचे पूजन केले.सर्व प्रमुख अतिथींसह उपस्थितांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले.
यावेळी ग्रीन स्कुलची संकल्पना असलेला भव्य केकही अतिथींनी कापला .शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक पी.एल.मेखा,आर.सी.मोराणकर,
एस.एम.बडगुजर,सी.झेड.पाटकरी,
एन.एम.पाटील,एस.डी.पाटील व सौ.एन.आर.वानखेडे यांचा समावेश होता.
मुख्याध्यापक महाले यांनी ग्रीन स्कुलची , डिजिटलायझेशन व पेपर लेस स्कुलची संकल्पना विशद केली. संचालक मंडळ व शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी करीत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचा ऋणनिर्देश केला.
यावेळी शाळेचे चेअरमन मुंदडे म्हणाले की, संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी संचालक मंडळ कायम सकारात्मक असते.संस्थेच्या हितासाठी कधी कधी कटू निर्णय घ्यावे लागतात .ग्रीन स्कूल संकल्पनेसाठी संचालक मंडळ व संस्था दीड लाख रुपये देणार असल्याचे जाहीर केले.
यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी,निवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.कोरोनामुळे विद्यार्थ्यांना कार्यक्रमाला जरी उपस्थित राहता आले नाही तरी ऑनलाईन(गुगल मिट) च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घरी बसल्या कार्यक्रमाचा आनंद घेता आला.कार्यक्रमात शालेय शिक्षक व शिक्षिका यांचा ग्रीन स्कूल ला पूरक पेहराव लक्षवेधी ठरला. सूत्रसंचालन शिक्षक अमित पाटील यांनी केले. आभार उपमुख्याध्यापक ए.एस.करस्कार यांनी मानले.