धुळे / लोक न्यूज-
शिंदखेडा तालुक्यातील खलाणे गट पोट निवडणुकीत महिला राखीव झाला आहे. यामुळे २०२०च्या निवडणुकीतील उमेदवारांची पुनरागमनाची संधी संपल्याने हिरमोड झाला आहे. तीन पंचवार्षिक नंतर पहिल्यांदाच हा गट सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला आहे. इच्छुकांमध्ये भाजपासह महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या परिवारातील महिला सदस्यांची मोठीच यादी आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनच्या पूर्व आणि पश्चिम भागात विभागलेला खलाणे गटात पहिल्यांदा
भाजपला संधी मिळाली होती. मात्र, ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे ही संधी अल्पवधी ठरली. शिवाय हा गट महिला राखीव झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. २००९ मध्ये खलाणे गट सर्वसाधारण असताना शिवसेनेचे साहेबराव उर्फ छोटू पाटील हे जिल्हा परिषदेत दाखल झाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये हा गट अनुसूचित जमाती महिला राखीव असल्याने या गटातून बेबीबाई मालचे या विजयी झाल्या होत्या. जानेवारी २०२०मध्ये झालेल्या निवडणुकीत खलाणे गट
ओबीसी राखीव होता. या गटातून भाजपचे युवराज | शिवाजी कदम ६ हजार ४६४ मते मिळवत विजयी झाले होते. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे शरद पंडित भामरे यांना ६ हजार १२५ | मते मिळाली होती. पहिल्यांदाच भाजपला या गटातून संधी मिळाली. मात्र, ओबीसी आरक्षण रद्द ठरवण्यात आल्यामुळे पोट निवडणूक होत आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीत सर्वसाधारण महिला राखीवमुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. हा गट नेमका कोणत्या पक्षाच्या पारड्यात जातो यावरून पुढील गणित ठरेल.