लोक न्यूज-
जळगाव. येथील जिल्हा रुग्णायातील परिचारिका यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकण्यात आले. सविस्तरअसे की,कोविड 19 या साथीने जळगाव जिल्यात हाहाकार उडाला असता. शासनाने जिल्हा रुग्णालय व प्रशासनाने तीन महिन्याच्या करावर परिचारिका भरती केली होती. परंतु अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता दोन दिवसापूर्वी 35ते40 परीच्रिका यांना कामावरून काढून टाकण्यात आले. परिणामी बाहेरील जिल्ह्यातील परिचारिका यांचेवर जणू काही आभाळ कोसळल्या सारखे झाले शासनाने आणीबाणी काळात आमचा जीव धोक्यात टाकून काम करून घेतले. गरज सरो वैद्य मरो या म्हणीचा प्रत्यय आला अशी तीव्र नाराजी व्यक्त केली. आमचे इतर ठिकाणी समायोजन करावे अन्यथा उपोषणाचं हत्यार उपसावे लागेल. महाराष्ट्र स्टेट सेक्यु रिटी गार्ड अँड जनरल वर्कर्स युनियन याचे तर्फे अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.यावेळी उपस्थित सोमा कढरे गौतम पार्वे,निशिगंधा हिव्हरकर. रेशमा बंदुडे, सीमा सोनार,शुभांगी ठाकरे, वैशाली इंगोले, अश्विनी साईंडणे, फरिदा तडवी, कविता महानुभाव