लोक न्यूज-
अमळनेर:आज दुपारी पार पडलेल्या अमळनेर नगपरिषदेच्या सर्वसाधारण सभा क्र. 44 चे आयोजन करण्यात आले होते. पण भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधत जिल्हाधिकारि यांनी कोरोना काळाचा हवाला देत ही लिलाव पद्धत रद्द ठरवून इ लिलाव पद्धतीने आयोजन करणांच्या सूचना दिल्या आहेत.
   आज दुपारी शिवाजी नाट्यगृहात अमळनेर न पा ची सभा क्र 44 आयोजित करण्यात आली होती यात 1 ते 8 विषय सर्वानुताने पास झाले.पण विषय क्र 9 हा वादग्रस्त ठरला.हा विषय होता कै. देवाजी बुधा महाजन व्यापारी संकुल! यपोटी 25 गाळ्यांसाठी 172 लोकांनी सुरक्षा अमानत म्हणून प्रती दुकान 50 हजार जमा केले होतें व सभेची रीतसर परवानगी होती असे असता कोरोना काळाचा हवाला देत जिल्हाधिकारी यांनी आदेश देत हा लिलाव संस्थगीत करून हा लिलाव इ लिलाव पध्दतीने घ्यावा असे लोकनियुक्त नगर अध्यक्षा सौ.पुष्पलता साहेबराव पाटील यांनी कळविले आहे.


"या गळ्यांचा लिलावास विरोध झाला होता कदाचित यामुळे हा लिलाव रद्द झाला अशी दबक्या आवाजात चर्चा होती. या निर्णयाचे स्वागत होत आहे."