लोक न्यूज-
नमस्कार अमळनेरकर मंडळी, आज आपल्या कडेही भरपूर कोरोनाचे पेशंट झाले. हे कशामुळे तर फक्त आपल्या हलगर्जीपणामुळे , मास्क नाही लावले तर काय होते, हात नाही धुतले तर काय होते, अन् सेनिटायाझर नाही वापरले तर कुठ काय होतंय, आपले वय कमी आहे. आपल्याला काय नाही होणार, अश्या विचाराने अन् आपल्या हलगर्जीपणामूळे , आपले कुटंबीय मिञ मंडळी , नातेवाईक आणि स्नेही कोरोना आजाराला बळी पडत आहेत.
आज आपल्या येथिल सर्वच हॉस्पिटल मध्ये जवळपास 65 च्या वर पेशंट ऑडमीट आहेत , त्यांमध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच प्रकारचे लोकं आहेत. त्यामुळे यावर उपाय म्हणून शासनाने उपलब्ध करून दिलेल्या कोरोना आजारावरील लस त्वरित घेवून शरीराला सुरक्षा कवच निर्माण करणे आहे.
आमच्या भागातील श्रीकृष्णपुरा, शारदा कॉलनी, वड चौक, सावतावडी, बालाजीपुरा, हनुमान नगर, श्रीराम कॉलनी, शिरूडनाका, झामी चौक, कसाली मोहल्ला, माळी वाडा,रुबजी नगर, यासह इतर भाग झामी चौकातील न. प. दवाखान्याशी जुळले असल्याने याभागातील जनतेसाठी प्रशासनाने कोरोना आजारावरील लस देण्याची सुविधा त्वरित उपलब्ध करून लसीकरण केंद्र सुरू करावे जेणेकरून शहरातील लसीकरणाची विभागणी होणून एकाच ठिकाणी जास्त गर्दी होणार नाही अन् लवकर उपाय योजना होण्यास मदत होईल.
याबाबत माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील अन् लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ पुष्पलताताई पाटील यांनी लक्ष केंद्रित करून मागणी माजी नगसेवक विक्रांत भास्करराव पाटील यांनी केली आहे.