लोक न्यूज-
अमळनेर: आज दि..21/2/2021 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या पथकाने बेधडक बिना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून एकूण 42,100 रु दंड वसुल केला.या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे.
जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी वाढत्या कोरोना बाबत चिंता व्यक्त करून बिनामास्क फिरणाऱ्या बेफिकीर लोकांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार अमळनेर येथील डी. वाय. एस. पी. राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंबादास मोरे आणि पथकाने अमळनेर शहरात ठिकठिकाणी बिना मास्क फिरणाऱ्या लोकांकडून एकूण 42,100 रुपयाचा दंड वसूल केला तर अन्नपूर्णा मंगल कार्यालयात जमलेल्या नागरिकांवर एकूण 90 केसेस करण्यात येऊन त्यांच्या कडून एकूण 21000 रु दंड वसूल करण्यात आला या कारवाईचे स्वागत होत आहे.अमळनेर शहरात सर्व ठिकानी मास्क घालून फिरणारे आढळून येत होते.