अमळनेर(रिपोर्ट)-
1ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शहरातील धुळे रोडवरील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकावरील प्रतिमेस विद्यमान आमदार अनिल पाटील,माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले,तर त्यानिमित्ताने वृक्षारोपण ही केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दीन, दुर्बल,शोषित,पीडित,उपेक्षित,
कामगार,वंचितांच्या दुःखाला आपल्या साहित्यातून ,शाहिरीतून वाचा फोडली आहे.अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ,गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये शाहिरीच्या माध्यमातून महत्वपूर्ण योगदान दिले आहे.कष्टकऱ्यांचे, कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी अवघे आयुष्य खर्ची घातले. रशिया मध्ये प्रथमतःअण्णाभाऊंनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातुन छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख करून दिली.
अण्णाभाऊंनी असंख्य कथा संग्रह,पोवाडे,कादंबऱ्या,प्रवास वर्णन,चित्रपट कथा,अशी मोठी साहित्याची निर्मिती केली आहे.तरी काल 1 ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त शहरातील मान्यवरांनी अभिवादन केले.
या प्रसंगी प्रांताधिकारी सीमा अहिरे,तहसीलदार मिलिंदकुमार वाघ,मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड,पोलीस निरीक्षक अंबादास मोरे,गोपनीय शाखेचे डॉ.शरद पाटील,माजी सभापती श्याम अहिरे,भाजप चे तालुकाध्यक्ष उमेश वाल्हे, प्रा.डॉ.विजय तूंटे,नगरसेवक श्याम पाटील,बी.आर.पी.चे जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरसे,सर्व समाजबांधव,पत्रकार,सामजिक कार्यकर्ते उपस्थित होते.