चोपडा (रिपोर्ट) --
 चोपडा तालुका भाजपा महायुती मित्रपक्षाकडून   दुध दर वाढीसाठी व इतर  स्थानिक समस्यांसाठी शिरपुर - बरहानपुर हायवे पंकज नगर स्टॉप वर  एल्गार आंदोलन करण्यात आले..
      राज्यातील सत्ताधारी आघाडी सरकारने जनतेला वार्‍यावर सोडले आहे.. दुध उत्पादकांसह राज्यातील सर्वच शेतकर्‍यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे..म्हणून अशा संकट काळात शेतकरी बांधवांना न्याय देण्यासाठी ,झोपलेल्या आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पाटीॅ व मित्र पक्षाच्या महायुतीतर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.
 दुध उत्पादकांना
 सरसकट १० रूपये प्रति लिटर व दुध पावडरला प्रति किलो ५० रूपये अनुदान मिळायलाच पाहिजे
      भारतीय जनता पार्टी,रिपाई आठवले गट,रासप,रयत क्रांती व शिवसंग्राम महायुतीच्या वतीने चोपडा येथे तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.  विशेष करून आंदोलन सुरू असतांना एका वाहनात पेंशट होते त्या वाहनास जाण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी जागा करून दिली.
आंदोलनातील प्रमुख मागण्या

 १) गाईच्या दुधाला  सरसकट १० रूपये प्रति लिटर व दुध पावडरला प्रति किलो ५० रूपये अनुदान मिळणेबाबत,
२)दुध खरेदीचा दर प्रति लिटर ३०/रुपये करण्यात यावा..
(
३)शेतकर्‍यांच्या मागील वर्षाचा घरात पडून असलेला कापूस,मका,आणि ज्वारी लवकरात लवकर हमी भावाने पूर्णपणे खरेदी करुन दिलासा द्यावा..
४)शेतकर्‍यांना युरिया सह,तत्सम खतांचा मुबलक पूरवठा करण्यात यावा,काळाबाजारी करणार्‍यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी..
५) कोरोना संकटकाळ,ताळेबंदी मधील तीन महिण्याचे अवाजवी आलेले विजबिल सरसकट माफ करावे..
इत्यादी मागण्याचे निवेदन  चोपडा भाजपा महायुतीकडून 
राज्य शासनाकडे मागणी करण्यात आली होती तसेच..ही मागणी मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता,कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात म्हणून शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पाटीॅकडून राज्य शासनाला निवेदन सादर करण्यात आले होते..परंतु गेंड्याच्या कातडी असलेल्या व झोपेचे सोंग घेतलेल्या राज्यातील सत्ताधारी आघाडी शासनाला शेतकरी बांधवांच्या,नागरिकांच्या वरील समस्या सोडवण्याची इच्छा दिसत नाही, म्हणून सरकारला वरील प्रश्नांवर जागे करण्यासाठी हे एल्गार आंदोलन करण्यात आले.
        १ आॅगस्ट  शनिवारी  ठिक- १० वाजता
पंकज नगर स्टाॅप  येथे भाजपा महायुती मित्रपक्षांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.
 आंदोलनाचे स्वरूप-
1) सर्व दुधसंकलन (ग्रामीण व शहरी भागातील)केंद्रे बंद ठेवण्यात आली 
2)रास्ता रोको करन्यात आले , दुध टँकर अडवून ठेवन्यात आले..
3)तहसीलदार यांना  निवेदन देण्यात आले .
आदोंलनच्याठिकाणी 
   श्री.तिलकजी शहा
   (जेष्ठ नेते चोपडा भाजपा),
     श्री.शांतारामआबा पाटील
(मा.जि.प.सदस्य),
श्री.आत्मारामभाऊ म्हाळके
(मा.सभापती पं.स.चोपडा ),
श्री.चंद्रशेखरदादा पाटील
       श्री. प्रदिपभाऊ पाटील
   (चोपडा विधानसभा संयोजक),
    श्री.राजुभाऊ शर्मा
     (मा.शहराध्यक्ष चोपडा),
    सौ.ज्योतीताई राकेश पाटील
सभापती महिला व बालकल्याण                    जि.प.जळगाव),
सौ.उज्ज्वलाताई प्रशांत म्हाळके
( कृषी व पशुसंवर्धन सभापती जि.प.)
श्री. गजेंद्रभाऊ पांडुरंग सोनवणे
     (जिल्हा परिषद सदस्य)
श्री.भुषणभाऊ भिल
 (उपसभापती चोपडा पं.समिती),
श्री.पंकज सुभाष पाटील
  (तालुकाध्यक्ष चोपडा ग्रामिण)
संचालक कृ.उ.बा.समिती चोपडा
श्री.धनंजय प्रभाकर पाटील,
श्री.भरत बापूराव पाटील
श्री.मगन मुरलिधर बाविस्कर,
  श्री.हिंमतराव पाटील
( मा.व्हाॅ.चेअरमन शेतकी संघ)
सौ.रंजनाताई श्रीकांत नेवे
 (संचालिका-तापी सह.सुतगिरणी)
श्री.नरेंद्र पाटील
  (जिल्हा उपाध्यक्ष यु.मोर्चा),हनुमंत महाजन , चंद्रकांत धनगर , डॉ मनोहर बडगुजर, प्रकाश पाटील ,तुषार पाठक , भरत सोनगिरे , मोहित भावे 
या आंदोलनात आजी-मा.पदाधिकारी ........,मा.सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती/उपसभापती, सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी, महायुतीचे सर्व पदाधिकारी, गटप्रमुख, गणप्रमुख,शाखाध्यक्ष, नगरसेवक,आघाडी/मोर्चा पदाधिकारी,शक्तीकेंद्रप्रमुख, बुथप्रमूख ,कार्यकर्ते बंधू,दुध उत्पादक शेतकरी बांधव,दुध सोसायट्यांचे पदाधिकारी  मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.