अमळनेर :(रिपोर्ट)
 “ ये कोरोना तुझ्यात दम असेल तेव्हडे आक्रमण कर बाजी पलटवण्याची धमक माझ्यात आहे ” असे म्हणत येथील जोशींपुरा भागातील 72 वर्षीय वृद्धाने एका महिन्यात दोनदा पॉझिटिव्ह आल्यानन्तरही कोरोनाला पराभूत केले आहे 

     तहसील कचेरीजवळ  जोशींपुरा भागात प्रभाकर सुपडू  दोरकर वय 72 यांचे निवसस्थानशेजारीच स्वस्त धान्य दुकान आहे प्रभाकर दोरकर याना 450 शुगर आहे तरी वयाच्या 72 व्या वर्षी ते नियमित कामे करतात लॉकडाऊन मुळे गरिबांना धान्य मिळाले नव्हते म्हणून तहसीलदारांनी स्वस्त धान्य दुकानदारांना सोशल डिस्टन्स ठेवून धान्य वाटप करायला सांगितले होते मात्र ही वस्ती गरीब लोकांची असल्याने धान्य घेण्यासाठी एकच गर्दी केली आणि जे नको होते तेच झाले 25 जून रोजी प्रभाकर दोरकर कोरोना पॉझिटिव्ह आले त्यांना कोविड सेंटरला दाखल केले त्यांच्या घरातील 8 जण पॉझिटिव्ह आल्याने  कोरोंटाईन झाले होते प्रभाकर दोरकर यांच्या वयाचा विचार करता त्यांना जिल्हा कोविड सेंटरला दाखल करण्यात आले घरातील सर्व अमळनेर ला ते एकटे असताना ते घाबरले नाहीत डॉक्टरांनी दिलेल्या सूचना आणि औषधाचे सेवन नियमित करून मनाचे धाडस करून ते अवघ्या 10 ते 12 दिवसात कोरोनामुक्त होऊन परत आले पण कोरोना काही त्यांचा पिच्छा सोडायला तयार नव्हता एकदा कोरोना झालेल्या माणसाला पुन्हा कोरोना होत नाही असे म्हणतात पण प्रभाकर दोरकर याना पुन्हा 16 जुलै रोजी रुग्णालयात दाखल केले पुन्हा त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला अति शुगर आणि 72 वय म्हणून पुन्हा जळगावला दाखल करण्यात आले प्रभाकर दोरकर यांनी मनाचा निश्चय केला की मी बरा होऊन घरीच जाणार आणि 28 जुलै रोजी रात्री ते पुन्हा कोरोनामुक्त होऊन परतले प्रांताधिकारी सीमा अहिरे , तहसीलदार मिलिंद वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी गिरीश गोसावी , ग्रामीण रुग्णालयाचे डॉ प्रकाश ताडे  वासुदेव जोशी समाजाचे अध्यक्ष विलास दोरकर , नारायण शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले 

    गरिबांना धान्य वाटप करणे अत्यन्त गरजेचे होते म्हणून मी धान्य वाटपाचा धोका पत्करला मात्र स्वतः हिम्मत खचलो नाही , उपचार पण व्यवस्थित मिळाले मनाची तयारी पक्की ठेवावी कोरोनाला पळवण्यात नक्की यशस्वी होऊ -- प्रभाकर दोरकर , जोशींपुरा अमळनेर