मुंबई(रिपोर्ट)
मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांची दुसऱ्यांदा राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्याच्या प्रीत्यर्थ उत्तर मुंबई रिपाइंच्या वतीने गरजूंना अन्न धान्याचे वाटप करण्यात आले.
रिपाइं आठवले गटाची ताकद मुंबई तसेच महाराष्ट्रात वाढवण्यासाठी अनेक रिपाइं कार्यकर्ते प्रयत्नशील असतात. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी तसेच आपल्या पक्षाला सत्ता केंद्रात आणण्यासाठी आठवले यांचे हात बळकट करायला हवेत, असे प्रतिपादन या वेळी बोलताना रिपाइंचे ज्येष्ठ नेते प्रकाश बनसोडे यांनी केले. कोरोना महामारीत दोन वेळचे जेवण अनेकांना दुरापास्त झाले आहे. अशा गरजूंना खारीचा वाटा उचलावा म्हणून रिपाइं कार्यकर्ते नेहमी प्रयत्नशील असतात. आशाच उद्दात हेतूने रविवारी बोरिवली, गोराई येथे प्रकाश बनसोडे यांच्या पुढाकाराने अन्न धान्य वाटप करण्यात आले. या वेळी मुंबई जिल्हा
उपाध्यक्ष शोभा बोडके, बोरिवली तालुका अध्यक्षा लक्ष्मी चव्हाण, विद्यार्थी नेते ऍड. संदीप केदारे, उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष सुरेश टिके, मालाड तालुका अध्यक्ष सुनील गमरे, कांदिवली तालुका अध्यक्ष, जगदीश झलटे , धनजंय जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते.