लोक न्यूज...

अमळनेर :  सुरत येथील वैजनताबाई भोई हिचाही खून सुमठाणे शिवारात खून केलेल्या अनिल संदानशीव यानेच केल्याचे अमळनेर पोलिसांनी  निष्पन्न  केले आहे.  २५ रोजी पहाटे त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात  आला आहे.
        उंदिरखेडा येथील शोभाबाई रघुनाथ कोळी वय ४८ या घरकाम करणाऱ्या महिलेचा सुमठाणे शिवारात खून झाल्याची बाब उघडकीस आली होती.  सुमठाणे येथील अनिल गोविंदा संदानशीव  याला पोलिसांनी अटक केली आहे.  दगडाने ठेचून तिचा खून केल्याचे उघडकीस होते.
      दरम्यान २३ रोजी त्याच घटनस्थळापासून अवघ्या ८०० मीटर अंतरावर जानवे ता अमळनेर  हद्दीत  पोलिसांना वैजंताबेन भगवान भोई वय ५० हिच्या आधारकार्ड ,साहित्य, कवटी , हाडे , चपला असे साहित्य आढळून आले. सुमठाणे शिवारातील खून देखील अमळनेर पोलिसांना आधी कळला होता. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचा संशय बळावला. त्यांनी तपासाची चक्रे फिरवली.  वैजंताबेन  ही  मूळ  फरकांडे ता एरंडोल येथील असून ती २ मे रोजी सुरत येथून गावी आली होती. नन्तर ती पुन्हा सुरत गेली तेथून बेपत्ता झाली होती. तिची हरवल्याची नोंद  सुरत पोलीस स्टेशनला  करण्यात आली होती.
    पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी  पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी , अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर , अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते , डीवायएसपी विनायक कोते, एलसीबी पोलीस निरीक्षक संदीप पाटील , उपनिरीक्षक शरद बागल , सहकारी पोलीस उपनिरीक्षक ,नामदेव बोरकर , समाधान गायकवाड ,  कैलास शिंदे , काशिनाथ पाटील , सागर साळुंखे  यांच्या मदतीने चहू बाजूने तपास सुरू केला. सर्व हाडे साहित्य जप्त केले असून फॉरेन्सिक प्रयोगशाळे मार्फत डीएनए चाचणी  केली.  तांत्रिक माहिती उपलब्ध केली.
    तपासात असे आढळून आले की अनिल गोविंदा  संदानशीव  हा सुरतहून  वैजंताबेन हिच्या सॊबत आल्याने संपर्कात आला.  ३ रोजी ती परत सुरत ला आली. त्यांनंतर ती पुन्हा संपर्कात आली. ५ रोजी पहाटे  तो तिला धुळ्याकडून तिला जानवे जंगलात घेऊन आला आणि पाच रोजी पहाटे चार साडे चार वाजेच्या सुमारास तिचा खून केला असा निष्कर्षं पोलिसांनी काढला. अनिल विरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.