मा. श्रीमती यशोमती ताई ठाकूर,मंत्री महिला व बालविकास विभाग यांचे अधिकाऱ्यांना निर्देश*
राजीनामा दिलेल्या,सेवानिवृत्त तसेच मयत झालेल्या अंगणवाडी सेविका, मदतनिस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांना दि.३० एप्रिल २०१४ रोजीच्या शासकीय आदेशानुसार सेविका १ लाख आणि मदतनिस व मिनी सेविका ७५ हजार रुपये एक रकमी सेवासमाप्ती लाभ राज्य शासनाने लागू केला आहे. त्यानुसार राज्यातील बहुतांश कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती लाभ मिळाला आहे. परंतु अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आणि मयत झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रकल्प व जिल्हा कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत.
याबाबत संघटनेने गेल्या अनेक दिवसांपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीच्याच दिवशी एल.आय.सी.मार्फत सेवासमाप्ती लाभाची रक्कम अदा करावी. यासाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू केला होता. त्याअनुषंगाने मा.श्रीमती यशोमती ठाकूर, मंत्री महिला व बालविकास यांनी नुकतीच एल.आय.सी.च्या अधिकारीऱ्यांसोबत याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी मुंबई येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठकीचे आयोजन केले होते.
सदर बैठकीत सेवासमाप्ती लाभाची रक्कम सेवासमाप्तीच्याच दिवशी अदा व्हावी याकरिता सेवासमाप्तीच्या किमान दोन महिन्यांआधी प्रस्ताव तयार करून मंजूरीची प्रक्रिया पूर्ण करण्याची कारवाई करण्यात यावी तसेच सेवासमाप्ती लाभाची प्रलंबित प्रकरणे १५ ऑगस्ट पूर्वी निकाली काढण्यात यावी आणि आगामी काळातील सदर प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यासाठी स्वतंत्र नोडल ऑफिसरची नियुक्ती करावी. असे निर्देश मा.श्रीमती यशोमती ताई ठाकूर यांनी एलआयसी च्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
*सदर बैठकीत एलआयसी अधिकाऱ्यांसह महिला व बालविकास विभागाच्या सचिव श्रीमती आय.ए.कुंदन,एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त श्रीमती. इंद्रा मालो सहभागी झाले होते.*
मा.मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या वरीलप्रमाणे निर्देशांमुळे सेवासमाप्ती लाभाची रक्कम सुरळीत व तात्काळ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून संघटनेने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये संतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष *मायाताई परमेश्वर, रामकृष्ण बी. पाटील, युवराज पी. बैसाणे, ऍड. गजानन थळे, दत्ता जगताप, सुमंत कदम, सुधीर परमेश्वर, अमोल बैसाणे, सर्व संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते.... यांनी सदर माहिती दिली*