अमळनेर : पोलिसांनी छापा टाकून जळोद गावाजवळ भडगाव व पाचोरा येथील आरोपीना पकडून सुमारे १५ किलो गांजा पकडला.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , एपीआय रवींद्र पिंगळे ,सुनील लोखंडे ,संतोष नागरे , अमोल पाटील , गणेश पाटील , जितेंद्र निकुंभे , प्रशांत पाटील , हर्षल पाटील ,योगेश बागुल ,सुनील पाटील यांनी ही कारवाई केली असून पाचोरा येथील आरोपी महेश कैलास पाटील वय ३१ रा भडगाव नितीन शरद गौंड वय १९ पाचोरा याना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.