अमळनेर तालुक्यातील गांधली येथील युवा व्यापारी तसेच सामाजिक, क्षेत्रात नेहमी अग्रेसर राहणारे नितीन शांताराम चव्हाण यांची फुले-शाहू-आंबेडकर यांच्या ज्वलंत विचारांची सामाजिक चळवळ क्रांतिसूर्य महात्मा फुले विचारमंच च्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदि नियुक्त्ती सर्वानुमते करण्यात आली आहे.
    फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचारांनी पेरीत होऊन क्रांतिसूर्य महात्मा फुले विचारमंच ची स्थापना करण्यात आली आहे.खान्देश सह महाराष्ट्रात विविध सामाजिक कार्यक्रम विचार मंचाच्या माध्येमातून नेहमी राबवले जातात महापुरुषांचे विचारांचा प्रसार प्रचार जास्तीत जास्त व्हावा हेच ध्येय घोरण चळवळीचे आहे. सदर नियुक्त्ती क्रांतीसुर्य महात्मा फुले विचार मंच महाराष्ट्र्र राज्य चे संस्थापक प्रवीण बी.महाजन,महासचिव अनिता महाजन यांनी संत सावता महाराज संजीवन सोहळा निमित्त साधून ऑनलाइन चर्चा घडवून केली असून सदर निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
     राष्ट्रपिता महात्मा फुले व महापुरुषांचे विचार घरा घरात पोहचवून चळवळीस एक नवी दिशा देऊन युवकांना संघटनेचे उद्देशानुसार सामाजिक क्षेत्रात त्या प्रवाहात संघटित करणार असल्याचे क्रांतिसूर्य महात्मा फुले विचारमचं चे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष नितीन चव्हाण यांनी संकल्प केला आहे.