चोपडा (रिपोर्ट) - कोरोनाच्या महामारीत संपूर्ण जग हादरले असताना चोपडा तालुका मात्र संयमाने तोंड देत आहे कोरोनाचा काळात शासन प्रशासन यंत्रणा उत्तम प्रकारे कार्य करीत आहे आणि शासन प्रशासनाला मदत म्हणून तालुक्यातील अनेक संस्था, दानशूरांनी भरभरून मदत केले आहे. या धर्तीवर तालुक्याचे तहसीलदार अनिल गावित यांना विविध माहिती मागण्या संदर्भाचे निवेदन चोपडा इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन मार्फत देण्यात आले.
covid-19 या जागतिक संकटात शासन-प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. शासनाला फुल नाहीतर फुलाची पाकळी म्हणून चोपडा शहर व तालुक्यातील विविध संस्था, व्यापारी ,नागरिक यांनी पंतप्रधान सहाय्यता निधी व मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आपापल्या परीने योगदान दिले आहे तरी सदर संस्थांची, व्यक्तींची नावे व त्यांनी केलेली मदतीची व तालुक्यातील एकूण मदतीची माहिती मिळावी तसेच covid-19 या युद्धात कोणकोणत्या एनजीओ सहभागी झाल्या व त्या एनजीओनी काय काय मदत केली त्यात जेवण, नाश्ता ,चहा, पाणी, बेडशीट गादी ,पीपीई किट, रोख रक्कम यासह विविध मदतीच्या स्वरुपासह केलेल्या मदतीची माहिती मिळावी तसेच कोविड सेंटरला ऍडमिट रुग्णांचा जेवणाच्या व्यवस्थेसाठी ठेका कोणत्या व्यक्तीस/ संस्थेस देण्यात आला आहे त्याचे दरपत्रक प्रति व्यक्ति, प्रति दिवस किती यासंदर्भातली माहिती मिळावी अशा विविध स्वरूपाच्या माहिती मागणी संदर्भात निवेदन देण्यात आले आहे .
सदर निवेदन देण्या मागच्या हेतू असा की ज्या दानशूरांनी मदत केली आहे त्यांचे ऋण फेडणे तसेच त्या व्यक्तीच्या संदर्भात लघु चित्रपट तयार करनार असल्याचे इलेक्ट्रॉनिक मीडिया असोशियन मार्फत सांगण्यात आले. निवेदन देतेवेळी इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष संदीप ओली , उपाध्यक्ष मिलिंद सोनवणे, सचिव आर डी पाटील, खजिनदार गणेश बेहरे, सदस्य नारायण साळुंखे, सदस्य शुभम माळी, सदस्य संदीप कोळी आदी उपस्थित होते....