अमळनेर : येथील साने गुरुजी शॉपिंग सेंटर मधील एका दुकानात गैर कायद्याची मंडळी जमवून जुगार अड्डा चालविणाऱ्या इसमावर अंमळनेर पोलिसांनी कारवाई केली आहे.
अमळनेर पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनाने पोलीस नाईक सुनील हटकर, पोहेका बापू साळुंखे, पोहेका संजय पाटील,पोलीस नाईक शरद पाटील व पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पाटील यांनी अमळनेर येथील साने गुरुजी शॉपिंग सेंटर मधील गीतांजली फूट वेअर या दुकानावर धाड टाकून झन्ना मन्ना खेळणाऱ्या 2 इसमांना ताब्यात घेऊन जुगाराचा खेळ लावणाऱ्या व विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या जिजाबराव भिका पाटील यांच्यावर जुगार ऍक्ट व दारूबंदी कायद्या नुसार कारवाई करून एकूण 87, 730 रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
शहरात कर्फ्यू सारखी परिस्थिती असूनही पोलीस निरीक्षक अंबादास मोरे कायदा व सुव्यस्था अबाधित राखीत आहेत.