खेडी ,अमळनेर (प्र.ज.) जनसुराज्य ग्रामविकास मंडळ खेडी प्र ज ता.अमळनेर येथील पदाधिकारी यांनी केली निर्जंतुक फवारणी व जनजागृती
        अल्पावधीतच नावारूपाला आलेली खेडी(प्र ज)  येथील जनसुराज्य ग्रामविकास मंडळाच्या पदाधिकारी व प्रतिनिधी यांनी गावातील कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी मंडळाच्या वतीने निर्जंतुकिकरण्यासाठी फवारणी करावी या एकमताने आज गावात फवारणी करण्यात आली व जनजागृती ही झाली
         मंडळाचे अध्यक्ष प्रा. ज्ञानदेव पाटील यांनी चौकाचौकात कोरोना विषयी जनजागृती केली,समज-गैरसमज,काय करावे याविषयी सविस्तर माहिती दिली
  या फवारणी मुळे गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून 'आम्हीच आमचे रक्षक' करणार ही प्रेरणा उदयास आली आहे
       
         फवारणी यशस्वी होण्यासाठी
पद्माकर पाटील,तानाजी पाटील, नांमदेव पाटील, यशवंत पाटील,विलास शिंदे,भास्कर शिंदे प्रबोधन पवार, अनिल जिभु पाटील, चंद्रकांत शिंदे, रवी नाना गोकुळ आबा,किरण पाटील, चंदू पाटील,विजय पाटील, राजेंद्र तात्या पाटील,अनिल शिरसाठ, किरण चव्हाण, सुनील शिरसाठ, दीपक नाईक, राजेश नाईक,व ग्रामस्थांनी व पदाधिकारी यांनी सहकार्य केले