अमळनेर(प्रतिनिधी)
अमळनेर तालुक्यातील झाडी येथे बाहेर गावाहून आलेले 64 लोकांना (Home quarantine) उजव्या हाताच्या मनगटावर शिक्का मारून घरातच बसण्याचा सल्लादिला,मारवड पोलिस स्टेशनचे API राहुल फुला यांनी कोरोना बद्दल नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या व ज्यांना हाताला शिक्का मारलेले आहे व अन्य दुसरे व्यक्ती कोणीही बाहेर मंदिर व चौकात घोळखा करून आढळल्यास त्यांच्या वरती गुन्हे दाखल करू असे पोलीस पाटील यांना सूचना दिल्या.
मारवड पोलीस स्टेशनचे API राहुल फुला,पोलीस पाटील, सरपंच,उपसरपंच,सदस्य,ग्रामसेवक प्रमोद पाटील, ग्रामपंचायत शिपाई ,प्राथमिक आरोग्य केंद्र मांडळचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर सागर पाटील, आरोग्य सहाय्यक के. डी. चौधरी, आरोग्य सेवक अरुण पाटील, आरोग्य सेविका प्रतिभा रूपा वारके, आशा वर्कर ज्योत्स्ना पाटील.यावेळी उपस्थित होते.