पारोळा(प्रतिनिधी)आज जळगांव येथिल कै गंधे सभागृह ला ना हायस्कुल येथे पार पडलेल्या शानदार समारंभात धाबे ता पारोळा शाळेचे उपक्रमशिल मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांना आपल्या मतदारसंघाचे खासदार मा नानासाहेब ए टी पाटील यांच्या हस्ते जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला।या कार्यक्रमाचे अध्यक्ष आरोग्य मंत्री महाराष्ट्र ना गिरीषजी महाजन,प्रमुख पाहुणे माजी महसुल मंत्री मा एकनाथरावजी खडसे,जि प अध्यक्षा ना उज्वलाताईसाहेब पाटील,जिल्हयातील सर्व आमदार,जि प चे सभापती व सर्व जि प सदस्य,जिल्हयातील सर्व पं स सभापती,जिल्हयातील सर्व शिक्षण क्षेत्रात कार्यरत अधिकारी,मा जिल्हाधिकारीसाहेब,सर्व पुरस्कारार्थी व त्यांचे नातेवाईक व हजारोच्या संख्येने शिक्षक बंधु बघिनी उपस्थित होते।
यावेळी साळुंखे यांच्या कामाचे व शाळेचे खा नानासाहेब यांनी कौतुक केले।
हा पुरस्कार,हा सोहळा माझ्या जीवनातील अमुल्य असा ठेवा बनुन राहील।या पुरस्काराचे काय महत्त्व असते ते हा सोहळा याच देही याच डोळा जो बघतो त्यालाच कळते।हा पुरस्कार माझ्यासाठी आजुन अनमोल ठरला तो माझे मार्गदर्शक प्रेरणास्थान आदर्श असे खा नानासाहेब यांच्या शुभहस्ते मला मिळाला।त्यांच्या परीस स्पर्शाने त्या पुरस्काराचे सोने झाले।
या साळुंखे यांना सपत्नीक पुरस्कार प्रदान करण्यात आला।सन्मानचिन्ह,शाल,पुष्पगुच्छ,रोख रक्कम पुस्तक व त्यांच्या पत्नी यांना श्रीफळ व खण प्रदान करण्यात आले।