लोक न्यूज
अमळनेर, दि. ११ डिसेंबर २०२५:
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील खामनाने गावात नाभिक समाजातील अवघ्या ९ वर्षांच्या बालिकेवर ७० वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीस पोलिसांनी अटक केली असून संपूर्ण नाभिक समाजात तीव्र संतापाची लहर पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका नाभिक संघटनेतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच राज्याचे गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात या प्रकरणाची विधानसभा अधिवेशनात नोंद घेऊन खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि आरोपीला फाशीची कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
संघटनेने निवेदनात म्हटले आहे की, या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील नाभिक समाज संतप्त असून समाजाच्या भावना तीव्र पणे दुखावल्या गेल्या आहेत. पीडित बालिकेला न्याय मिळावा व अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना कडक शिक्षा मिळाली पाहिजे, असेही नमूद करण्यात आले.
हे निवेदन महाराष्ट्र नाभिक महामंडळ तसेच अमळनेर तालुका नाभिक कार्यकारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सादर करण्यात आले.
सही करणाऱ्यांमध्ये पुढील पदाधिकारींचा समावेश आहे :
• श्री. मधुकर तुळशिराम सैंदाणे – तालुकाध्यक्ष
• श्री. दिलीप राजाराम सोनवणे – तालुका उपाध्यक्ष
• श्री. सिताराम महादु बोरसे – तालुका सचिव
• श्री. भिकन दंगल सैंदाणे – तालुका खजिनदार
• श्री. जगदिश गोविंदराव ठाकरे – तालुका संपर्क प्रमुख
• श्री. नंदलाल नामदेवराव जगताप – तालुका संघटक
• श्री. सुरेश रमेश वारूळे – जिल्हा सदस्य
• श्री. गणेश दगडू सैंदाणे – जिल्हा सदस्य
या प्रकरणातील पुढील कारवाईकडे आता संपूर्ण समाजाचे लक्ष लागले आहे.