अमळनेर :लोक न्यूज
दुर्गा फाउंडेशन संचलित कै. श्री दादासाहेब व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल, अमळनेर येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठीचा वार्षिक क्रीडा महोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शाळेच्या प्रशस्त मैदानावर दि. 10, 11 व 12 डिसेंबर 2025 असे तीन दिवस विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन मा. श्री. उत्कर्ष पवार, संस्थेच्या सचिव मा. सौ. अलका पवार तसेच उपाध्यक्ष मा. श्री. उमाकांत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांनी क्रीडा ज्योत प्रांगणात मिरवत क्रीडा महोत्सवाची भव्य सुरुवात केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापिका सौ. वर्षा सोहिते यांनी प्रास्ताविकातून शाळेतील क्रीडा क्षेत्राचा आढावा सादर केला. यावेळी मार्गदर्शन करताना संस्थेचे चेअरमन मा. श्री. उत्कर्ष पवार यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच मैदानावर विविध खेळ खेळावेत, निरोगी व तंदुरुस्त राहावे, असा मोलाचा सल्ला दिला.
क्रीडा महोत्सवात पूर्व-प्राथमिक वर्गासाठी पॅकिंग बॅग्स, फ्रॉग जंप, बुक बॅलन्सिंग, रनिंग रेस यांसारखे विविध मजेशीर खेळ आयोजित करण्यात आले होते. तर प्राथमिक वर्गासाठी सॅक रेस, स्पायडर रेस, 100 व 300 मीटर धावणे, बॉटल रेस, लेमन अँड स्पून, थ्री लेग्स रनिंग तसेच कबड्डी अशा विविध स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली क्रीडा कौशल्ये सादर केली.
या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा समारोप दि. 13 डिसेंबर 2025, शनिवार रोजी बक्षीस वितरण समारंभाने झाला. बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हवालदार दीपकसिंग पपोला व सुभेदार धीरेंद्र प्रतापसिंग, 49 MH बटालियन एनसीसी, अमळनेर यांची उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुण्यांनी दीपप्रज्वलन करून बक्षीस वितरणास प्रारंभ केला तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सर्व स्पर्धकांचे भरभरून कौतुक केले.
या स्पर्धांमध्ये यलो हाऊस ने सर्वोत्तम प्राविण्य चषक पटकावला, तर रेड हाऊस ला उपविजेतेपद (Runner Up) मिळाले.
सर्व क्रीडा स्पर्धांचे निरीक्षण क्रीडा शिक्षिका प्रतीक्षा पाटील, रोशनी महाजन, नीतू शेलकर व जयश्री परदेशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका योगिता फाळके व नीतू शेलकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षिका मनीषा सोनार यांनी केले.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षिका कविता पाटील, प्रियंका महाले, संगीता पाटील, मनीषा ठाकूर, चारुलता तायडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी भाग्यश्री पाटील व सविता चौधरी यांनी मोलाचे सहकार्य केले.
एकूणच हा वार्षिक क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा ठरला.