लोक न्यूज
अमळनेर :- येथील नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्र. 8 अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग) मधून अखेरच्या दिवशी सर्व उमेदवारांनी माघार घेतल्याने अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचे तरुण उमेदवार सचिन बळवंत पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत.
प्रभागातील उमेदवारांची एकामागून एक माघार होताच शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजय साजरा केला. विशेष म्हणजे, प्रथमच निवडणूक इच्छुक असलेल्या सचिन पाटील यांना तरुण वर्गाच्या आग्रहास्तव आघाडीने उमेदवारी दिली होती. त्यानंतर अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले माजी नगरसेवक विवेक पाटील यांनी मोठेपणा दाखवून स्वखुशीने माघार घेतली. तसेच यतीन अशोक पवार यांनीही स्वयंस्फूर्तीने माघार घेतल्याने सचिन पाटील बिनविरोध विजयी झाले.
विजयानंतर सचिन पाटील यांनी समर्थकांसह आमदार अनिल पाटील आणि खासदार स्मिताताई वाघ यांच्या निवासस्थानी भेट देत जल्लोष साजरा केला.
यावेळी बोलताना आमदार अनिल पाटील म्हणाले की, “सचिन पाटील यांनी सदैव नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी निस्वार्थीपणे धाव घेतली. साधी स्वभावशैली, सर्वसमावेशक दृष्टीकोन आणि सातत्यपूर्ण जनसंपर्कामुळे ते जनतेच्या मनात स्थान मिळवू शकले. आजचा बिनविरोध विजय हा त्यांच्या कार्याची जनतेने दिलेली पावती आहे.”
पुढे आमदारांनी सांगितले की, प्रभाग 8 अ मधील जनतेने शहर विकास आघाडीवर दाखवलेला विश्वास अधिक दृढ झाला असून हा विजय आघाडीच्या विकासनितीला मिळालेली मोठी भरारी आहे.