लोक न्यूज
अमळनेर शहरातील डॉ. मुठे यांच्या गणेश हॉस्पिटलसमोर उभी केलेली लाल रंगाची शाईन मोटरसायकल (एमएच 19 सीसी 2081) अज्ञात चोरट्यांनी दुपारी साडेचार वाजता चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ही मोटरसायकल जयेश संजय जगताप यांच्या मालकीची असून, सानेगुरुजी विद्यालयाचे उपशिक्षक संजय जगताप हे डोळ्यांची तपासणी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते.
ते बाहेर आल्यानंतर मोटरसायकल जागेवर न आढळल्याने त्यांनी त्वरित पोलिसात तक्रार नोंदवली. चोरीची संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हालचाली दिसून आली असून पोलिसांनी फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू केला आहे.
या दिवसाढवळ्या झालेल्या चोरीप्रकरणामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.