लोक न्यूज
अमळनेर येथील जैन सोशल ग्रुप आयोजित नूतन सी.ए. 2025 क्लब भेट व सन्मान सोहळा थाटात पार पडला. भगवान महावीर प्रार्थनेने कार्यक्रमाची सुुरुवात करण्यात आली.
सभेत वर्षातील सदस्यवाढचालू सेवा उपक्रम, तसेच संचालक मंडळाच्या चर्चांचा आढावा घेण्यात आला. यंदा झालेल्या विविध सेवा प्रकल्पांना, नवकर जैन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला, मार्गदर्शन सत्रांना व सन्मान सोहळ्याला समाजाकडून मिळालेल्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले.
ऐतिहासिक यश – सहा सीए उत्तीर्ण
या वर्षी अमळनेर जैन समाजातील सहा विद्यार्थ्यांनी सीए परीक्षा उत्तीर्ण केल्याने समाजासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. तालुकास्तरावर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळाल्याची नोंद झाली.
कार्यक्रमात सीए श्रीपाद झाबक यांनी नवोदित सीए विद्यार्थ्यांची माहिती सादर करत सीए शिक्षणाचे महत्त्व आणि करिअरमधील संधी यावर प्रभावी मार्गदर्शन केले.
यानंतर अध्यक्ष सौरभ छाजेड व संचालक मंडळाच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार सचिव प्रितेश जैन यांनी मानले. या सोहळ्याची माहिती कीर्तीकुमार कोठारी यांनी प्रसिद्धीस दिली.
सन्मानित नूतन चार्टर्ड अकाउंटंट्स
• जयेश संजय जैन
• आकाश अजयराज जैन
• सिद्धेश सुरेंद्र जैन
• देवेंद्र प्रविण पारख
• रोनक संदेश कोठारी
• प्रीतम विजय डागा