लोक न्यूज
“एक नंदुरबारवरून नेतृत्व करतो, दुसरा जळगाववरून नेतृत्व करण्यासाठी बोलावला जातो, मग अमळनेरला हे लोक वाऱ्यावर सोडणार आहेत का?” असा थेट सवाल करत आमदार अनिल पाटील यांनी नगराध्यक्षपदासाठी स्थानिक नेतृत्वालाच संधी देण्याचे आवाहन अमळनेरकरांना केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आमदार पाटील म्हणाले की, “नगराध्यक्ष हा स्थानिकच असावा. शहरातील प्रश्नांवर 24 तास तत्पर राहणारा, जनतेसाठी वेळ देणारा आणि कार्यक्षमतेने काम करणारा उमेदवारच योग्य ठरतो.”
स्थानिक उमेदवार जितेंद्र ठाकूर योग्य — पाटील
शहर विकास आघाडीतर्फे उमेदवारी देण्यात आलेले जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की,
“अनेक वर्षे पत्रकारितेतून सेवा देत त्यांनी स्वतःला घडवले आहे. कणखर व्यक्तिमत्त्व, स्थानिक परिचय आणि 24 तास उपलब्धता या सर्व गुणांमुळे ते नगराध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार आहेत.”
त्यांना स्वतः आमदार पाटील, खासदार स्मिताताई वाघ आणि माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे मार्गदर्शन कायम लाभणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांवर टीका : ‘अमळनेरकरांना न ओळखणारा बाहेरगावचा उमेदवार लादला’
विरोधकांनी दिलेल्या उमेदवारावर टीका करत आमदार पाटील म्हणाले की,
“ज्यांना अमळनेर ओळखत नाही, जे जळगावमध्ये वास्तव्यास आहेत, अशा उमेदवाराला फक्त ‘एसटी आरक्षण हौसेसाठी’ दाखल केले आहे. हे नेतृत्व शहराच्या प्रश्नांपासून दूर राहणार आहे.”
पूर्वी दोनदा नकार देऊनही बाहेरगावच्या नेत्यांकडून अमळनेरवर बाहेरचा उमेदवार लादण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘नगरपालिका वाऱ्यावर सोडणार आहात का?’
विरोधकांच्या गैरहजरपणावर बोट ठेवत ते म्हणाले,
“निवडणूक काळ वगळता हे नेताच दोन दोन महिने अमळनेरला येत नाहीत. त्यांचा उमेदवार नगराध्यक्ष झाला तर नगरपालिका कोण पाहणार?”
स्थानिकांना पाठिंबा देण्याचे आवाहन
अमळनेरकर जनतेने शहर विकास आघाडीचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्षपदासाठी जितेंद्र ठाकूर यांना विजयी करून स्थानिक नेतृत्वाला संधी द्यावी, असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले.