लोक न्यूज
आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरात राजकीय वातावरण तापू लागले आहे. मतदारांमध्ये उत्सुकता दिसून येत असून, सुशिक्षित, शांत व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या उमेदवारीची घोषणा होताच शहरातील विविध घटकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्व मिळणार असल्याचा आत्मविश्वास मतदारांमध्ये दिसून येत आहे.
आरोग्य क्षेत्रातील कार्याचा फायदा शहराला होणार
डॉ. बाविस्कर हे वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असल्याने नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजांची त्यांना उत्तम जाण आहे. शहरातील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यासाठी आणि लोकांच्या आरोग्यसुरक्षेच्या दृष्टीने परिणामकारक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. त्यांचा अनुभव आणि सामाजिक बांधिलकी यांचा उपयोग शहराच्या आरोग्यविषयक योजनांमध्ये नक्कीच होईल, असे मत नागरिकांमध्ये उमटत आहे.
खुले भूखंड विकसित करण्याचा मनसुबा
शहरातील मोकळे भूखंड विकसित करून ओपन जिम, जॉगिंग ट्रॅक, तसेच लहान मुलांसाठी खेळण्यांची साधने उपलब्ध करण्याचा डॉ. बाविस्करांचा मानस असून, नागरिकांना आरोग्यदायी आणि स्वच्छ जीवनशैलीचा पर्याय उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर आहे. नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
उच्च शिक्षण आणि संस्कारांचे नेतृत्व
डॉ. परीक्षित बाविस्कर हे उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शहराचा कायापालट होईल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. व्यावसायिक, व्यापारी, नोकरवर्ग आणि सर्वसामान्य नागरिक यांच्याकडून त्यांना मिळणारा वाढता प्रतिसाद हेच याचे द्योतक आहे. अनेकांच्या मते, शिवसेनेकडून मिळालेला उमेदवार हा "आपला माणूस" असल्याचा विश्वास जनतेमध्ये दृढ होत आहे.
उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ
प्रभाग क्रमांक १२ मधील उमेदवार पुष्पा पंकज भोई (मोरे) व सुयोग ज्ञानेश्वर धनगर, तसेच प्रभाग क्रमांक ४ मधील उमेदवार निता नरेश कांबळे व नावीद शेख यांच्या प्रचाराचा शुभारंभ डॉ. बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी प्रभागातील मतदारांनी मोठ्या उत्साहाने स्वागत करत डॉ. बाविस्कर यांना शुभेच्छा दिल्या. तीनही धनुष्यबाण चिन्ह असलेल्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार मतदारांनी व्यक्त केला.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमात नाना धनगर, विलास कंखरे, नरेंद्र कांबळे, गुलाम नबी, पंकज चौधरी, राहुल कंजर, अमन सह इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सर्व पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांना शुभेच्छा देत आगामी निवडणुकीत उत्तम यश मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.