अमळनेर | लोक न्यूज :
तालुक्यातील देवळी येथे बांधकामाच्या ठिकाणी एका कामगारावर जातीवाचक शिवीगाळ करत चाकूने हल्ला करून खिशातील रोकड हिसकावल्याची घटना मंगळवारी (२२ जुलै) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चैतन्य राजेंद्र संदानशिव हे देवळी येथील आर. बी. कन्स्ट्रक्शनच्या कामावर असताना आरोपी अनंत निकम तेथे आला. त्याने चैतन्य यांना जातीवाचक शिवीगाळ करत चाकूने डाव्या छातीजवळ व पोटाच्या भागात वार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर चैतन्य खाली पडताच आरोपीने त्यांच्या खिशातील एक हजार रुपये काढून घेतले. तसेच दुसऱ्या खिशातील ४० हजार रुपये काढण्याचाही प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
जखमी चैतन्य यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या फिर्यादीवरून अनंत निकम याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ३०९(६), ११५(२), ३५१(२), ३५२ तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यातील कलम ३(१)(आर), ३(१)(एस), ३(२)(व्हीए-२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) विनायक कोते करीत आहेत.