लोक न्यूज
वैजापूर, दि. १६ : देशातील अर्ध सैनिक दलाच्या कार्यरत व सेवानिवृत्त जवानांच्या कल्याणासाठी, त्यांच्या कौटुंबिक व वैयक्तिक समस्यांचे मार्गदर्शन, समाजोपयोगी, शैक्षणिक व राष्ट्रीय उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या अर्ध सैनिक कल्याण भवन व कार्यालयाचे लोकार्पण वैजापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
नगरपालिका वैजापूरने उपलब्ध करून दिलेल्या हुतात्मा जगन्नाथ भालेराव स्मारक येथील प्रशस्त इमारतीत हा सोहळा संपन्न झाला. माजी नगराध्यक्षा शिल्पा दिनेशभाऊ परदेशी यांच्या हस्ते फीत कापून भवनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी दिल्ली येथील पॅरामिलिटरी फोर्सचे अध्यक्ष एच. आर. सिंह (एडीजीए), महासचिव रणबीरसिंह, महाराष्ट्र अर्ध सैनिक कल्याण बोर्डाचे अध्यक्ष अशोक संगेवार, गुजरात अर्ध सैनिक कल्याण दलाचे अध्यक्ष दीपेश पटेल, नगरसेवक दशरथ बनकर, नबी पटेल, वैजापूर डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजीव डोंगरे, डॉ. सुभाष भोपळे, डॉ. अमोल अन्नदाते, समाजसेवक धोंडीरामसिंह राजपूत, वैजापूर अर्ध सैनिक कल्याण संघटनेचे अध्यक्ष श्री. देवकर, महासचिव गौतम गायकवाड, मेजर किशोर पाटील, सुमनबाई गायकवाड, सीताबाई गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
या भवनासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार रमेश बोरनारे तसेच तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. दिनेशभाऊ परदेशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नामफलकाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर स्मारक परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी यांनी हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असून अर्ध सैनिक जवानांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष एच. आर. सिंह यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, "सेवानिवृत्त अर्ध सैनिक जवानांनी संघटित होणे ही काळाची गरज आहे. देशाच्या सीमांचे खरे रक्षक अर्ध सैनिक दलाचे जवानच असून त्यांना शासनाकडून योग्य हक्क, पेन्शन व आरोग्य सुविधा मिळणे आवश्यक आहे."
महासचिव रणबीरसिंह यांनी जवानांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी एकत्रितपणे लढा देण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र अर्ध सैनिक कल्याण दलाचे अध्यक्ष अशोक संगेवार यांनी वैजापूरच्या या ऐतिहासिक उपक्रमाचे कौतुक केले. गुजरात अर्ध सैनिक कल्याण दलाचे अध्यक्ष दीपेश पटेल यांनीही देशाच्या सुरक्षेत अर्ध सैनिक दलाचे योगदान अनन्यसाधारण असल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात महासचिव गौतम गायकवाड यांनी या भवनाची दारे कार्यरत व सेवानिवृत्त जवानांसाठी सदैव खुली राहतील, असे सांगून संघटनेच्या भावी उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले. आभार प्रदर्शन गौतम गायकवाड व किशोर पाटील यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
या सोहळ्यास देशभरातील तसेच महाराष्ट्रातील विविध विभागांतून कार्यरत व सेवानिवृत्त अर्ध सैनिक दलाचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये सरपंच दौलत गायकवाड, सजनराव गायकवाड, अनिल वाणी, उत्तम शिंदे, शंकर आघाव, रामदास चाटे, नीलकंठ उल्हारे, दादा थोरात, राजेंद्र भोपळे, नाना गव्हाणे, काशिनाथ कदम, सुभाष फेरण, अशोक ढवळे, तुकाराम गायकवाड, श्रीमती केशर बारगळ यांच्यासह अनेक माजी जवान उपस्थित होते.