लोक न्यूज (गोरख आखाडे, वारुड)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वारूळ येथे विविध विकासकामांना प्रारंभ करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार राज्यमंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमारभाऊ रावल यांच्या हस्ते दलित वस्तीतून वाहणाऱ्या गुलजार नदीवर प्रस्तावित पुलाचे भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात स्थानिक ग्रामस्थ, दलित व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली पुलाची मागणी पूर्ण होत असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या पुलासाठी सुमारे २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यामुळे गावातील वाहतूक व दळणवळण सुलभ होणार आहे.
याचबरोबर वारूळ येथील ग्रामदैवत राजमाता मंदिर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी २० लाख रुपयांच्या निधीतून सामाजिक सभागृह उभारण्यासही मान्यता देण्यात आली आहे. या सभागृहामुळे गावातील धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांना मोठी मदत होणार आहे.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी विकासकामांची माहिती देत गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. स्थानिक नागरिकांनी देखील या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.
या सर्व विकासकामांसाठी श्री. गोरख दशरथ आखाडे (मानवाधिकार सहायता संघ तालुकाध्यक्ष तसेच अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा कार्यकारिणी सदस्य, भाजपा) यांच्या वतीने तसेच वारूळ गावातील दलित व आदिवासी वस्ती तर्फे मा. जयकुमारभाऊ रावल यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
“दिलेल्या शब्दाची पूर्तता करत विकासकामांना गती दिल्याबद्दल आम्ही सर्व गावकरी आपल्या ऋणी आहोत,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला.