लोक न्यूज
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात आज (दि. 18 एप्रिल 2026) सकाळी एसटी बस आणि पिकअप वाहनामध्ये अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंद्रकांत मोतीलाल पटेल (वय 54), हे राज्य परिवहन महामंडळाच्या शिंदखेडा आगारात चालक म्हणून कार्यरत आहेत. आज सकाळी 6 वाजता ते बस क्रमांक MH 20 BT 1804 घेऊन जळगाव–दोडाईचा मार्गावर निघाले होते. त्यांच्या सोबत वाहक विलास गंगाराम सोनवणे होते.
सकाळी सुमारे 8.15 वाजण्याच्या सुमारास अमळनेर तालुक्यातील जैतपीर शिवारात, गलवाडे गावाजवळ हनुमान मंदिराजवळ बस चालवत असताना समोरून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा पिकअप (क्रमांक MH 04 HS 0061) ने जोरदार धडक दिली.
धडकेनंतर चालकाने तत्काळ बस थांबवून प्रवाशांची विचारपूस केली. सुदैवाने बसमधील कोणालाही दुखापत झाली नसल्याचे स्पष्ट झाले. पिकअप चालकाने आपले नाव विश्वास भरत पाटील (रा. माळपिंप्री, ता. एरंडोल, जि. जळगाव) असे सांगितले.
अपघातात एसटी बसच्या ड्रायव्हर साईडच्या पुढील बंपर, हेडलाईटजवळील भाग आणि पत्रा नुकसानग्रस्त झाला आहे. तसेच पिकअप वाहनाच्या बंपर व इंजिनलाही नुकसान झाले आहे.
फिर्यादीच्या तक्रारीवरून संबंधित चालकाविरुद्ध निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवून अपघात घडवून आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी संजय सूर्यवंशी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
पोलिसांकडून या अपघाताचा अधिक तपास सुरू आहे.