लोक न्यूज
अमळनेर-तालुक्यातील हिंगोणे खु.प्र.ज.च्या लोकनियुक्त सरपंच श्रीमती राजश्री राजेश पाटील यांच्या संकल्पनेतून हिंगोणे ग्रामपंचायत 100 टक्के थकबाकीमुक्त झाली असून
श्रीमती पाटील यांनी स्व.खर्चातून संपुर्ण गावाचा कर भरल्याने आणि त्या कराच्या पैशातून थकीत वीज बिल देखील भरले गेले आहे.
हिंगोणे खू. प्र. ज ग्रामपंचायतीने लाईट बिलाच्या थकीत रकमेचा धनादेश नुकताच विद्युत विभागाकडे सुपूर्द केला,माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे.आता हिंगोणे ग्रामपंचायत 100 टक्के थकबाकीमुक्त झाली असल्याने ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले आहे.सरपंच राजश्री पाटील यांनी गावच्या सरपंचपदाची धुरा सांभाळल्यानंतर गावासाठी अनेकविध स्तुत्य उपक्रम राबविले.यात प्रामुख्याने गाव दरवाजा,नवीन स्मशानभूमीचे बांधकाम,ग्रामपंचायत कार्यालय,पाणी पुरवठा योजना,संपूर्ण गावात रस्ता काँक्रीटीकरण,आधुनिक व डिजिटल अंगणवाडी,शनिदेव मंदिराचे बांधकाम,महादेव मंदिराचा जीर्णोध्दार ही कामे प्रामुख्याने करण्यात आली.या व इतर विकासकामांमुळे आपोआप गावाची वाटचाल विकासाच्या दिशेने सुरू झाली.
विकास कामासोबतच राजश्री पाटील यांनी स्वखर्चाने संपुर्ण गावाची ९ लाख रुपये घरपट्टी व पाणीपट्टी भरली.यामुळे पंचायतीला कर स्वरूपाने चांगले पैसे मिळाले आणि दुसऱ्या बाजूला ग्रामस्थांना आर्थिक झळ सोसावी लागली नाही.
याच घरपट्टी व पाणीपट्टीच्या पैशातून गावाकडे थकित असलेले ७ लाख ८० हजार रुपये बिलाचा धनादेश महावितरण चे अमळगाव कक्षाचे सहाय्यक अभियंता उज्वल पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.यावेळी आमदार अनिल भाईदास पाटील हे स्वतः उपस्थित होते.त्यांनी देखील ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे कौतुक केले.यावेळी ग्रामसेवक पवनकुमार वाघ,वायरमन प्रमोद सैंदाने उपस्थित होते.