लोक न्यूज

दि. १६/१२/२०२५ रोजी रूहानी मानव केंद्र, नवानगर यांच्या वतीने परम संत बालजितसिंहजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने एक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद मराठी शाळा नरडाणा, उर्दू शाळा नरडाणा तसेच जिल्हा परिषद मराठी शाळा पिंप्राड, ता. शिंदखेडा, जि. धुळे येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

या उपक्रमामध्ये गरजू व वंचित विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, वह्या, दप्तर तसेच आवश्यक शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह दिसून आला. शिक्षणाबद्दल गोडी निर्माण व्हावी व कोणताही विद्यार्थी शैक्षणिक साहित्याअभावी मागे राहू नये, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या वेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, रूहानी मानव केंद्राचे कार्यकर्ते तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले व रूहानी मानव केंद्राच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडवण्याचा संदेश देणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला.