लोक न्यूज

अमळनेर - धनगर समाजाला संविधाना नुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभर आंदोलन सुरू असून
ही लढाई आता निर्णायक टप्प्यावर आली आहे, असे प्रतिपादन एसटी आरक्षणाचे प्रवर्तक दीपक बोराडे यांनी अमळनेर येथे  आज दि २७ रोजी आयोजित कार्यक्रमात केले.
            आरक्षणाच्या विषयावर बोलताना दीपक बोराडे म्हणाले की, या राज्यात आरक्षणासाठी अनेक समाजांनी संघर्ष केला आहे. मात्र धनगर समाजातील
अज्ञान व भोळेपणामुळे समाजाचा खरा मित्र ओळखता आला नाही. राजकारणी मात्र चतुर व धूर्त असून समाजाने आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर पैसा व वेळ खर्च केला, तरीही अपेक्षित यश मिळालेले नाही.समाजासाठी अनेक ठिकाणी आंदोलन झाली, परंतु आता ही आरक्षणासाठीची शेवटची आणि निर्णायक
लढाई आहे.
           धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळाल्यास समाजातील सर्व घटकांचे कल्याण होणार असून हे
आरक्षण पूर्णपणे घटनात्मक हक्कावर आधारित आहे.मात्र त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन दिले होते मात्र अद्याप प्रत्यक्षात ते मिळालेले नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात समाजाने
एकसंध राहून ताकदीने संघर्ष करणे आवश्यक आहे. सरकारने धनगर समाजाची दखल घेऊन तात्काळ आरक्षण द्यावे, अन्यथा समाजाला पुढील भूमिका ठरवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
              यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक सुयोग धनगर, सुवर्णा हटकर,दीपक चौगुले यांचा सत्कार करण्यात आला.तसेच अर्बन बँकेचे संचालक मोहन सातपुते व कृषी
उत्पन्न बाजार समितीचे संचालक समाधान धनगर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन दीपक बोराडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
                  कार्यक्रमाचे प्रस्ताविक धनगर समाजाचे ज्येष्ठ पदाधिकारी बन्सीलाल भागवत यांनी केले. त्यांनी
समाजाची झालेली पिछेहाट मांडत, समाजाने एकत्र राहून नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.एकीचे बळ हेच समाजाचे खरे सामर्थ्य आहे, असे त्यांनी सांगितले.राष्ट्रवादी भटक्या-विमुक्त सेलचे तालुकाध्यक्ष एस.सी.तेले यांनी राज्यभर उपोषण करून आरक्षणासाठी
लढा उभारणार असल्याचे जाहीर केले व सर्व समाजबांधवांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा,असे आवाहन केले.
         यावेळी भाजप शहर उपाध्यक्ष देवा
लांडगे, दिलीप ठाकरे, नामदेव ठाकरे, शांताराम ठाकरे,चेतन देवरे, आनंदा धनगर, दिनेश भलकर, मनोज रत्नपारखी, गजानन धनगर, ए. बी. धनगर, दिलीप
खांडेकर, प्रा. जी. एल. धनगर, त्र्यंबक धनगर, परशुराम ठाकरे, तुषार धनगर, मनोज मोरे यांच्यासह समाजबांधव
मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन देवरे यांनी केले.