अमळनेर, ता. २८ ऑक्टोबर :
लोक न्यूज
अमळनेर तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असून शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे. कापूस, मका, सोयाबीन यांसारख्या काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजावर आर्थिक संकट ओढावले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या वतीने प्रशासनाकडे तात्काळ मदत मिळावी यासाठी मागणी करण्यात आली आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीचा घास हिरावला गेला असून शेतकरी वर्गामध्ये हताशेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून सरसकट मदत जाहीर करावी आणि शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
हे निवेदन मा. उपविभागीय अधिकारी सो. अमळनेर, तहसीलदार सो. अमळनेर, तसेच तालुका कृषी अधिकारी सो. अमळनेर यांना देण्यात आले.
या निवेदनावर मा. आमदार डॉ. बी. एस. पाटीलतालुकाध्यक्ष डी. एम. पाटीलजिल्हा उपाध्यक्ष प्रा. अशोक पवार सरशहराध्यक्ष प्रशांत निकमतालुका युवक अध्यक्ष योगेश शिसोदेकिसान सेलचे तालुकाध्यक्ष मनोहर पाटीलमहिला तालुकाध्यक्ष योजना पाटील, तसेच वासुदेव मामा, शांताराम कोळी, महेंद्र लोहार, कृष्णा पाटील, अनिल पाटील जानवे, संजय मधुकर पवार, हरीश लाड (पातोंडा), चिंधू वानखेडे (अमळनेर), वासुदेव पाटील, वसंत पाटील (गांधली) आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षाने प्रशासनाला इशारा दिला आहे की, शेतकऱ्यांना तात्काळ मदत न मिळाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल.